एकरकमी एफआरपीसाठी ऊसाची मोळी खांद्यावर घेऊन सदाभाऊ, पडळकरांचे आंदोलन

राज्यातील State अनेक कारखानदारांनी एफआरपीचे FRP पैसे दिलेले नाहीत. अशा सर्व कारखानदारांवर Sugar factory सरकारने कारवाई करून शेतकऱ्यांच्या Farmers ऊसाचे Sugarcane पैसे द्यावेत अशी मागणी केली.
Sadabhau Khot, Gopichand Padalkar
Sadabhau Khot, Gopichand Padalkarsarkarnama

मुंबई : ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एकरकमी एफआरपी मिळावी, या मागणीसाठी आमदार सदाभाऊ खोत व आमदार गोपीचंद पडळकर यांनी ऊसाची मोळी खांद्यावर घेऊन विधिमंडळ प्रवेशव्दारावर आंदोलन केले. यावेळी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, आमदार सुधीर गाडगीळ, माजी आमदार सुधीर पारवे उपस्थित होते.

एकरकमी एफआरपी मिळावी, अशी शेतकरी संघटनांसह भाजपची मागणी आहे. पण राज्यातील कारखान्यांनी एकरकमी एफआरपीची रक्कम दिलेली नाही. सर्व कारखान्यांनी एफआरपीचे तुकडे केले आहेत. त्यामुळे अधिवेशनात रयत क्रांती संघटनेचे नेते आमदार सदाभाऊ खोत व भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी विधिमंडळाच्या प्रवेश व्दारासमोर ऊसाची मोळी खांद्यावर घेऊन आंदोलन केले.

Sadabhau Khot, Gopichand Padalkar
दोन टप्प्यात एफआरपी देऊनच दाखवा; रणसंग्राम जवळच : शेट्टींचा गर्भित इशारा

यावेळी त्यांनी एकरकमी एफआरपी द्यावी, राहिलेल्या ऊसाला हेक्टरी ५० हजार रुपये अनुदान द्यावे तसेच राज्यातील अनेक कारखानदारांनी एफआरपीचे पैसे दिलेले नाहीत. राज्यातील अशा सर्व कारखानदारांवर सरकारने कारवाई करून शेतकऱ्यांच्या ऊसाचे पैसे द्यावेत आदी मागण्या केल्या. यावेळी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर साहेब, आमदार सुधीर गाडगीळ व माजी आमदार सुधीर पारवे उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com