खोत, पडळकर चिडले : परब तुम्ही स्मशानात जा आणि...
Sadabhau Khotsarkarnama

खोत, पडळकर चिडले : परब तुम्ही स्मशानात जा आणि...

आज झालेल्या बैठकीला सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) व आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांना निमंत्रण देण्यात आले नव्हते.

पुणे : मुंबईतील आझाद मैदानात सुरु असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. याबरोबरच सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांनी परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांच्यावर जोरदार टीका केली आहे. खोत म्हणाले, अनिल परब म्हणतात चर्चा कुणाशी करायची, अरे मग तुम्ही स्मशानात जा आणि भुतांशी चर्चा करा, असा खोचक सल्ला खोत यांनी परबांना दिला आहे. ते माध्यमांशी बोलत होते.

Sadabhau Khot
शिवसेनेने पुढाकार घेतला अन् तासगाव आगारातून धावली लालपरी

एसटी कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यासाठी गेल्या 14 दिवसांपासून एसटी कर्मचारी संपावर (ST workers strike) आहेत. या संपावर तोडगा काढण्यासाठी आज (ता.20 नोव्हेंबर) मुंबई सेंट्रल येथील एसटी महामंडळ मुख्यालयात परिवहन मंत्री अनिल परब यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली. या बैठकीला महाराष्ट्र राज्य कनिष्ठ श्रेणी एसटी कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष अजय गुजर उपस्थित राहणार होते. मात्र, या बैठकीला माजी मंत्री सदाभाऊ खोत व आमदार गोपीचंद पडळकर यांना निमंत्रण देण्यात आले नाही. यामुळे आमदार गोपीचंद पडळकर व खोत यांनी चांगलाच संताप व्यक्त केला आहे.

Sadabhau Khot
एसटीची कारवाई सुरूच : 238 जणांची सेवा समाप्त; तर 297 निलंबित

सदाभाऊ खोत म्हणाले, कामगारांना न्याय कसा देता येणार नाही त्यां च्यासोबत परिवहन मंत्री हे चर्चा करत आहे. आतापर्यंत 45 एसटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्या आहे. मात्र, शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना वेळ नाही. फक्त पोलिसांचा वापर केला जात असून शिससौनिकांना लाठ्या-तलवारी देऊन आगारात घुसवले जात आहे. यामुळे कर्मचारी हद्यविकाराच्या झटक्याने मरत आहे. ही शिवशाही नाही मोगलशाही आहे, असा घणाघात त्यांनी सरकारवर केला आहे.

परब म्हणतात की, आंदोलन दिशाहीन झाले, नेतृत्व नाही. परब यांना माझी विनंती आहे की, तुमच्याशी चर्चा करण्याची आमची लायकी नाही. तुमच्या एव्हढी आमची उंची नाही. आता तुम्ही स्मशानात जा आणि भुतांशी चर्चा करा असा खोचक टोला त्यांनी परबांना लगावला आहे.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in