सदाभाऊंनी अर्ज भरला पण भाजपचं तिकीट नाही; चंद्रकांतदादांनीचं दिलं स्पष्टीकरण

सदाभाऊ खोत यांनी गुरूवारी विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला.
Sadabhau Khot Latest Marathi News
Sadabhau Khot Latest Marathi NewsSarkarnama

मुंबई : रयत क्रांती संघटनेचे संस्थापक व माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी गुरूवारी विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यांचा अर्ज भरण्यासाठी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटीलही उपस्थित होते. त्यामुळे खोत यांना भाजपने उमेदवारी दिल्याची जोरदार चर्चा होती. पण त्यांनी अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज भरला असल्याचे पाटील यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केलं आहे. (Chandrakant Patil Latest Marathi News)

भाजपच्या पाच अधिकृत उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. तर खोत यांनीही आज अर्ज दाखल केल्याने निवडणुकीतील चुरस वाढली आहे. खोत यांना भाजपकडून उमेदवारी दिल्याची चर्चा सुरू होती. पण पाटील यांनी याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे. माध्यमांशी बोलताना पाटील यांनी खोत हे अपक्ष उमेदवार असतील असं सांगितलं. (Sadabhau Khot will contest MLC election)

Sadabhau Khot Latest Marathi News
विराट सभेचा फॉर्म्यूला! नितेश राणेंनी 'तो' फोटो ट्विट करताच खैरे संतापले

पाटील म्हणाले, भाजपच्या केंद्रीय पार्लमेंटरी बोर्डाने पाच अधिकृत उमेदवार घोषित केले. उमा खापरे यांचा अर्ज आज भरला आहे. याव्यतिरिक्त भाजपने शेतकऱ्यांचे नेते, माजी मंत्री सदाभाऊ खोत यांचाही अपक्ष उमेदवारी अर्ज भरला आहे. त्यांच्या उमेदवारीला भाजपचा पाठिंबा आहे. त्यामुळे पाच अधिकृत आणि एक अपक्ष अशा सहा जागांसाठी भाजप प्रयत्न करणार आहे.

भाजपने काल विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी पाच उमेदवारांची घोषणा केली आहे. यात प्रविण दरेकर आणि प्रसाद लाड (Prasad Lad) या विद्यमान आमदारांना पुन्हा संधी देण्यात आली आहे. तर माजी मंत्री राम शिंदे (Ram Shinde) यांचे विधानसभेतील पराभवानंतर विधानपरिषदेवर पुनर्वसन करण्यात आले आहे. याशिवाय श्रीकांत भारतीय आणि उमा खापरे यांच्या नावाची घोषणा केली आहे. भाजपच्या केंद्रीय निवडणुक कार्यालयाकडून बुधवारी महाराष्ट्रातील पाच उमेदवारांच्या नावाची घोषणा करण्यात आली.

Sadabhau Khot Latest Marathi News
शिवसेनेचे आमदार मुक्कामी असलेल्या हॉटेलात शेलार गेले अन् केसरकरांशी बोललेही!

भाजपकडे हक्काची ११३ मते आहेत. त्यामुळे भाजपचे चार उमेदवार सहज निवडून येऊ शकतात. तर पाचव्या उमेदवारासाठी महाविकास आघाडीला समर्थन असलेल्या २२ मतांची बेगमी करावी लागणार आहे. त्यातच सदाभाऊ खोत यांनाही उमेदवारी देत भाजपने डाव टाकला आहे. पण मतांची जुळवाजुळव कशी होणार, याबाबत उत्सुकता वाढली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com