
Mumbai News : शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर (Sada Sarvankar) यांनी गोळीबार केल्या नसल्याचा पोलिसांचा अहवाल समोर आला आहे. गणेशोत्सवात दरम्यान ही घटना घडली होती.गणेश विसर्जनदरम्यानचा हा प्रकार आहे. यातलं महत्त्वाच निरीक्षण म्हणजे, बंदूक सदा सरवणकरांचीच होती. मात्र गोळी अन्य व्यक्तिने झाडली, असं अहवालात नमूद करण्यात आलं आहे.
यावर ठाकरे गटाचे नेते सचिन अहिर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अहिर म्हणाले, ठआता हे किती हास्यास्पद आहे. सर्वांनी टिव्हीवर पाहिलं. एखाद्याचं शस्त्र दुसऱ्याकडे आलं तरी ते कायद्याने गुन्हा आहे. मग हा गोळीबार केला कुणी? शासन कोणाचंही असो, आपण मुंबईत राहतो. मुंबईची कायदा सुव्यवस्था आणि पोलिसांची विश्वासार्हता, अशा गोष्टींमुळे ढासळून जाईल की काय?हा प्रश्न निर्माण होणार आहे? ज्यांनी हे केलं त्यांना चौकशीसाठी तरी बोलवा. पण अशा गोष्टी न करता, असा प्रकारचा रिपोर्ट आणून, सत्तेचा दुरूपयोग केला जातोय," असे अहिर म्हणाले.
यावर स्वत: सरवणकरांनी प्रतिक्रिया दिली आहे. सरवणकर म्हणाले, आनंद आहे की सत्य बाहेर येतंय. हा गोळीबार झालाच नव्हता, हे खरं आहे. ज्यावेळी ही घटना घडली त्यावेळी फक्त राजकारण करण्यात आलं होतं. पोलिसांनी अखेर सत्य बाहेर आणले आहे . ती एफआयआर पोलिसांनी दाखल केलं होतं. घटनेच्या ठिकाोणी माझ्या गाडीत रिव्हाँल्वर होतं. यादरम्यान ते मिस-फायर झालं. याला गोळीबार म्हणता येत नाही. आणि हे मिसफायर कधी झालं हे आम्हालाही माहिती नव्हतं, असे सरवणकर म्हणाले.
काय आहे प्रकरण?
मागील गणेशोत्सव विसर्जन मिरवणूक (ganesh visarjan2022) पार पडताना, प्रभादेवी येथील मिरवणुकीच्या वादाचे पडसाद उमटले होते. प्रभादेवी (prabhadevi) परिसरातील सार्वजनिक गणेश विसर्जन मिरवणुकीत ठाकरे आणि शिंदे गटातील कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला होता. त्यानंतर दोन्ही गटात मध्यरात्री हाणामारी झाली होती.
या प्रकऱणी २५ ते ३० जणांवर गुन्हा दाखल करत पोलिसांनी ५ जणांना ताब्यात घेतले होते. तसेच, ठाकरे गटातील कार्यकर्त्यांवरही गुन्हे दाखल करण्यात आले होते. शिंदे गटाचे कार्यकर्ते संतोष तेलवणे यांनी तक्रारीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला होता. या राड्यावेळी शिवसेनेच्या सुनील शिंदे यांनी शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर (Sada Sarvankar) यांच्यावर गंभीर आरोप केला होता. आमदार सरवणकरांनी हवेत गोळीबार केल्याचा आरोप केला जात होता. दोन्ही गटातील कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आले होते.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.