सचिन वाझे अनिल देशमुखांना म्हणायचा 'नंबर १' तर परमबीर सिंगांना 'राजा'

सीबीआयच्या (Cbi) अहवालत धक्कादाय खुलासा
Sachin waze, Anil Deshmukh
Sachin waze, Anil Deshmukhsarkarnama

मुंबई : माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांचे स्वीय सहायक संजीव पालांडे यांच्या जामीन अर्जावर सीबीआयकडून (CBI)न्यायालयात उत्तर दाखल करण्यात आले आहे. यात निलंबीत पोलिस अधिकारी सचिन वाझे (Sachin Vaze) अनिल देशमुख यांना 'नंबर १' म्हणायचा, तर मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांना 'राजा' म्हणायचा, असा गौप्यस्फोट करण्यात आला आहे.

माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी १०० कोटी रुपयांच्या वसुलीचे आरोप केलेल्या भ्रष्टाचार प्रकरणात बडतर्फ सचिन वाझेसह संजीव पालांडे आणि कुंदन शिंदे या देशमुख यांच्या दोन सहाय्यकांनाही अटक करण्यात आली आहे. ते सध्या तुरुंगात आहेत. सचिन वाझे या प्रकरणात माफीचा साक्षीदार बनला आहे. पालांडे यांनी विशेष सीबीआय न्यायालयात जामिनासाठी अर्ज दाखल केला आहे.

Sachin waze, Anil Deshmukh
..तर अजितदादांना मुख्यमंत्री करा; सुप्रिया सुळेंचा मुख्यमंत्री शिंदेंना खोचक टोला

बुधवारी यावर सीबीआयकडून लेखी उत्तर दाखल करण्यात आले. वाझे देशमुखांना 'नंबर १' तर परमबीर सिंग यांना 'राजा' संबोधायचा. त्यामध्ये सीबीआयने अनेक गोप्यस्फोट केले आहेत. वाझे मुंबईतल बार मालकांकडून 'नंबर १'च्या नावाखाली पैसे वसूल करत होता, असा जबाब त्याने दिल्याचे सीबीआयने आपल्या प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे.

Sachin waze, Anil Deshmukh
स्वप्नाली सावंतांचा खून करण्यासाठी वर्षभरापासून होते आरोपींचे प्लॅनिंग

या प्रकरणात राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख सध्या तुरुंगात आहेत. परमबीर सिंग यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवून देशमुख यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. सचिन वाझे यांच्या मार्फत अनिल देशमुख हे मुंबईमधून १०० कोटी रुपयांची वसुली करत होते, असा आरोप परमबीर सिंग यांनी केला होता. या प्रकरणावरुन राजकीय वातावरण तापले होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com