Sachin waze ला जामीन मंजूर : पण मुक्काम तुरुंगातच

जामीन मिळाल्यास वाझे पुराव्याशी छेडछाड करु शकतो, असं सांगत ईडीने त्याच्या जामीनाला विरोध केला होता.
Sachin waze ला जामीन मंजूर : पण मुक्काम तुरुंगातच

Sachin Waze मुंबई : मनी लॉंण्ड्रिग प्रकरणी बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझे याला जामीन मंजूर झाला आहे. वाझेने जामीनासाठी अर्ज केल्यानंतर ईडीने या अर्जाला विरोध दर्शवला होता. दरम्यान, ईडीच्या प्रकरणात वाझेला जामीन मिळाला असला तरी इतर प्रकरणात त्याला न्यायालयीन कोठडी मिळाली असल्याने वाझेला सध्यातरी तुरुंगातच राहाव लागणार आहे. 

जामीन मिळाल्यास वाझे पुराव्याशी छेडछाड करु शकतो, असं सांगत ईडीने त्याच्या जामीनाला विरोध केला होता. या प्रकरणी दोन्ही बाजूंचा युक्तीवाद 15 नोव्हेंबर रोजी पूर्ण झाला होता. वाझेच्या विरोधात ईडी, सीबीआय आणि एनआयए प्रकरण प्रलंबित असल्याने वाझेला सध्यातरी तुरंगातच राहाव लागणार आहे.

Sachin waze ला जामीन मंजूर : पण मुक्काम तुरुंगातच
वाझे माफीचा साक्षीदार होताच देशमुख झाले मुख्य आरोपी ; CBIकडून आरोपपत्र दाखल

मनी लॉण्ड्रिग प्रकरणात महाविकास आघाडी सरकारच्या १०० कोटींच्या वसुली प्रकरणातील मुख्य आरोपी सचिन वाझेला आता माफीचा साक्षीदार करण्यात आले होतेय. वाझे माफीचा साक्षीदार झाल्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी देशमुखांवर सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन (cbi) ने  अनिल देशमुख यांच्याविरोधात आरोपपत्र दाखल केलं होतं.

उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या "अँटिलिया' निवासस्थानासमोर स्फोटकांनी सापडलेल्या स्कॉर्पिओ गाडी प्रकरणात सहाय्यक पोलिस निरीक्षक सचिन वाझे यांना राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) आज अटक केली. 

अंबानी यांच्या मुंबईतील "अँटिलिया' निवासस्थानाजवळ पार्क केलेल्या कारमध्ये जिलेटिनच्या कांड्या सापडल्या होत्या. अंबानी यांना संदेशाद्वारे धमकीही दिली होती. त्यानंतर कारमधील स्फोटक प्रकरणाचा तपास एनआयएकडे सोपवण्यात आला आहे. उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या मुंबईतील "अँटिलिया' निवासस्थानाजवळ पार्क केलेल्या कारमध्ये जिलेटिनच्या कांड्या सापडल्या होत्या. अंबानी यांना संदेशाद्वारे धमकीही देण्यात आली होती.

अंबानी यांच्या घरासमोर ज्या गाडीत स्फोटके आढळली होती त्या गाडीचा मालक मनसूख हिरेन यांची होती. त्यानंतर हिरेन यांचीही हत्या झाल्याने एकच खळबळ उडाली होती. या प्रकरणी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेचे सहायक वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन वाझे, त्यांचा सहकारी रियाझ काझी आणि पोलीस निरिक्षक सुनील मानेंला एनआयएकडून प्रथम अटक करण्यात आली होती. तर दुसरीकडे ईडीनेही सचिन वाझे, अनिल देशमुख आणि इतरांविरोधात मनी लाँड्रिंग प्रकरणी गुन्हा दाखल केला होता. सीबीआयने भ्रष्टाचाराच्या प्रकरणात सचिन वाझे, अनिल देशमुख आणि इतर दोघांना अटक केली. तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या सांगण्यानंतर मुंबईतील बार आणि रेस्टॉरंटकडून पैसे गोळा केल्याचं सचिन वाझेने तपासादरम्यान सांगितलं होतं.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com