मोठी बातमी : सचिन वाझेनं आता परमबीरसिहांनाच आणलं अडचणीत

बडतर्फ सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन वाझे याची चांदीवाल समितीसमोर आज उलटत पासणी घेण्यात आली.
Param Bir Singh and Sachin Waze
Param Bir Singh and Sachin Waze Sarkarnama

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्यावर मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीरसिंह (Param Bir Singh) यांनी केलेल्या आरोपांची चौकशी करण्यासाठी राज्य सरकारने निवृत्त न्यायाधीश कैलास उत्तमचंद चांदीवाल यांची एक सदस्यीय उच्चस्तरीय चौकशी समिती (Chandiwal Committee) नेमली आहे. या समितीसमोर आज बडतर्फ सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन वाझे (Sachin Waze) याने परमबीरसिंह यांनाच अडचणीत आणले आहे.

बडतर्फ सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन वाझे याला नुकतेच चांदीवाल समितीसमोर हजर करण्यात आले. त्यावेळी त्याने तो केवळ एक छोटे प्यादे असल्याचे सांगितले होते. तसेच, समितीवर पूर्णपणे विश्वास असल्याचेही त्याने स्पष्ट केले होते. त्याने स्वत:ला प्यादे म्हटले असल्याने मोठे खेळाडू कोण, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. दरम्यान, आज देशमुखांचे स्वीय सहाय्यक संजीव पलांडे यांच्या वतीने त्यांचे वकील शेखर जगताप यांनी वाझेची उलट तपासणी घेणार होती. परंतु, यांनी वाझे यांनी याला सुरवातीला नकार दिला.

आधी परमबीरसिंहांची चौकशी करा, अशी भूमिका वाझेने घेतली. परमबीरसिंह यांनी देशमुखांवर आरोप करणारे पत्र लिहिले होते. तेच आता पत्रातील आरोप ऐकीव माहितीच्या आधारे केल्याचे म्हटले आहे. मूळ आरोप करणारेच असे म्हणत असतील तर चौकशी इथेच थांबायला हवा. चौकशी करायची असेल तर आधी परमबीरसिंहांची करावी. माझी उलटतपासणी घेण्याची गरज नाही. परमबीरसिंहांनी पत्र लिहताना विचार केलेला दिसत नाही. त्यांनी केवळ इतर व्यक्तींकडून ऐकलेल्या आरोपांच्या आधारे पत्र लिहिल्याचे कबूल केले आहे.

Param Bir Singh and Sachin Waze
देशमुखांनी 100 कोटींची खडंणी मागायला सांगितली का? अखेर वाझेनं दिलं उत्तर

दरम्यान, आज परमबीरसिंहांच्या वकिलांनी आयोगासमोर हजेरी लावली. परमबीरसिंह यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेले आरोप ऐकीव माहितीवर केले होते. त्यामुळे समितीसमोर साक्षीदार म्हणून ते हजर होण्यास कोणतेही महत्व नाही. त्यांनी काही अधिकाऱ्यांकडून ऐकलेल्या माहितीच्या आधारे हे आरोप करण्यात आले होते. याबाबत परमबीरसिंहांना थेटपणे कोणतीही माहिती नव्हती. ते आयोगासमोर साक्षीदार म्हणून हजर झाले तरी कायद्यानुसार त्याला काही महत्व असणार नाही. कारण ते सांगतील ती माहिती इतरांनी त्यांना सांगितलेली असेल, असे परमबीरसिंहांच्या वकिलाने आयोगाला सांगितले. परमबीरसिंह साक्षीदार म्हणून हजर राहणार नसले तरी ते आयोगासमोर पुढील आठवड्यात प्रतिज्ञापत्र सादर करतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Param Bir Singh and Sachin Waze
चांदीवाल समितीसमोर वाझेनं तोंड उघडलं अन् दिली अनेक प्रश्नांची उत्तरे

सहाय्यक पोलीस आयुक्त संजय पाटील आणि बडतर्फ सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन वाझे यांच्यातील संवादाविषयी परमबीरसिंह यांनी सादर केलेला व्हॉटसअॅपवरील मजकूर आणि परमबीरसिंह यांची बदली झाल्यानंतर त्यांनी पत्राद्वारे जाहीर केलेले आरोप याच्या परस्पर संबंधांची शहानिशा ही समिती करीत आहे. उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया निवासस्थानासमोर स्फोटके असलेली मोटार सापडली होती. याप्रकरणी बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझे यांच्या अटकेनंतर मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीरसिंह यांची राज्य सरकारने बदली केली होती. या बदलीनंतर परमबीरसिंह यांनी थेट गृहमंत्र्यांकडून पैसे वसुलीसाठी दबाव असल्याचा आरोप केल्याने मोठी खळबळ उडाली होती.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com