Sachin Sawant : मोदींमुळे पोलीस दलांची ओळख पुसणार ; एकाच प्रकारचा गणवेश लोकशाहीसाठी घातक !

Sachin Sawant : , देशाला एकाच रंगात रंगवणे विविधता शक्ती असलेल्या देशातील लोकशाही व संविधान दोघांसाठी घातक.
Sachin Sawant, narendra modi one country one uniform police news update
Sachin Sawant, narendra modi one country one uniform police news updatesarkarnama

Sachin Sawant : पोलिसांच्या गणवेशाबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी (narendra modi)यांनी केलेल्या विधानाबाबत सध्या चर्चा सुरु आहे. (one country one uniform police news update)

"देशातील पोलिसांना एकाच प्रकारचा गणवेश असावा," असं मत नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केलं आहे. हरियाणातील सूरजकुंड येथे आयोजित राज्यांच्या गृहमंत्र्यांची दोन दिवसीय परिषदेत मोदींनी हा प्रस्ताव ठेवला आहे.

पोलिसांसाठी एक देश, एक गणवेश हा फक्त चिंतनासाठी ठेवण्यात आलेला प्रस्ताव आहे. तो राज्यांसाठी सक्तीचा नाही, राज्यांवर लादण्याचा प्रयत्न नसल्याचंही पंतप्रधान मोदींनी स्पष्ट केलं. ते केंद्रीय गृहमंत्रालयाकडून आयोजित करण्यात आलेल्या चिंतन शिबिरात बोलत होते. मोदींच्या या प्रस्तावावर कॉंग्रेसने नाराजी व्यक्त केली आहे.

Sachin Sawant, narendra modi one country one uniform police news update
NIA : राज्यातील तपास यंत्रणांना मोदी सरकार निष्प्रभ बनवत आहे ; कॉंग्रेस आक्रमक

"राज्यांचे पोलिस दल त्या राज्याची ओळख असते. ती ओळख पुसण्याची कल्पना संघराज्य प्रणालीच्या विरोधात आहे. राज्यांना कमकुवत करुन केंद्र ताकदवर होणे, देशाला एकाच रंगात रंगवणे विविधता शक्ती असलेल्या देशातील लोकशाही व संविधान दोघांसाठी घातक आहे," असं टि्वट करुन काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

सूरजकुंड येथे मोदी नेमके काय म्हणाले..

  1. तरुणांची मने अतिरेकी आणि विघातक गोष्टींकडे वळवणाऱ्या शक्तींचा सामना करण्यासाठी सज्ज व्हायला हवे. देशभरातील पोलिसांना एकाच प्रकारचा गणेवश असल्यास त्याची मागणी वाढेल. पोलिसांसाठी अधिक चांगल्या दर्जाचे गणवेश तयार होऊ शकतील. तसंच देशभरात कुठेही लोक पोलिसांना गणवेशावरून ओळखू शकतील.राज्ये त्यावर आपापल्या दलांची चिन्हे लावू शकतील.

  2. तरुणांना भरकटवणाऱ्या, बंदुका किंवा लेखणीच्या माध्यमातून पसरणाऱ्या नक्षलवादाचा बिमोड करायला पाहिजे. या शक्तींना मोठय़ा प्रमाणावर आंतरराष्ट्रीय मदतही मिळत असते असा दावा मोदींनी केला. राज्यांनी आपले जुने कायदे काळानुरुप बदलायला हवेत.

  3. सर्व यंत्रणांच्या समन्वयाने कायदा आणि सुव्यवस्थेसमोर असणाऱ्या वाढत्या आव्हानांचा सामना करावा असेही पंतप्रधान मोदी म्हणाले. राज्यांनी इतरांच्या अनुभवातून शिकावे आणि अंतर्गत सुरक्षेसाठी एकत्र येऊन काम करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com