त्या गौप्यस्फोटानंतर सचिन सावंतांनी केली आशिष शेलारांवर कारवाईची मागणी

Ashish Shelar| Sachin Sawant| हिंदूत्वाच्या मुद्दय़ावर शिवसेनेची साथ सोडू नये, अशी भाजपची प्रामाणिक भूमिका होती
 Sachin Sawant| congress
Sachin Sawant| congress

मुंबई : भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी संयुक्त सरकारची २०१७ मध्येच सर्व तयारी झाली होती. पण राष्ट्रवादीने शिवसेनेबरोबर (Shivsena) सत्तेत सहभागी होण्यास विरोध केल्याने तेव्हा त्रिपक्षीय सरकार स्थापन होऊ शकले नाही. असा गौप्यस्फोट भाजप (BJP) आमदार आशिष शेलार य़ांनी केला आहे. एका वृत्त वाहिनीली दिलेल्या मुलाखतीत बोलताना त्यांनी भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या (NCP) आघाडीबाबत भाष्य केलं आहे. या मुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

त्यानंतर कॉंग्रेस नेते सचिन सावंत यांनी आशिष शेलारांच्या या दाव्यावर उत्तर देत भाजपकडे शेलारांवर कारवाईची मागणी केली आहे. सचिन सावंत यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे २०१४ चे एक ट्विट शेअर करत आशिष शेलारांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. ''अशा तऱ्हेचे वक्तव्य करुन आशिष शेलार यांनी सन्माननीय विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर टिका केली आहे. स्वपक्षीय नेत्याच्या शब्दांवर विश्वास ठेवू नये असे ते जनतेला सांगत आहेत. भाजपाने तात्काळ शेलार यांच्यावर कारवाई करावी अन्यथा चंद्रकांत पाटील यांचेही तेच मत आहे, असे दिसेल. असे सचिन सावंत यांनी म्हटले आहे.

 Sachin Sawant| congress
बच्चू कडूंना पोलिस अधीक्षकांकडून क्लिन चिटअसतानाही न्यायालयाने ठेवला ठपका!

राज्यात देवेंद्र फडणवीस सरकार असताना शिवसेनेचे मंत्री व नेते खिशात राजीनामे देण्याची आणि आणि जहरी भाषा वापरुन त्रास देत होते. २०१७ मध्ये भाजपच्या वरिष्ठ नेतृत्त्वाने राष्ट्रवादी काँग्रेसला सत्तेत सहभागी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यासाठी खात्यांचे वाटप, निवडणुकांमधील जागावाटप अशी चर्चाही झाली होती. महाराष्ट्रात भाजप- शिवसेना- राष्ट्रवादी असे तीन पक्षांचे सरकार असावे आणि शिवसेनेला सरकारमधून दूर करू नका, असा आदेशही भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने दिला होता. पण, शिवसेनेबरोबर सत्तेत सहभागी होण्यास राष्ट्रवादीने नकार दिल्याने त्यावेळी तीन पक्षांचे सरकार येऊ शकले नाही. आम्हाला शिवसेनेला सरकारमधून काढायचे नव्हते. हिंदूत्वाच्या मुद्दय़ावर शिवसेनेची साथ सोडू नये, अशी भाजपची प्रामाणिक भूमिका होती. असेही शेलार यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com