'कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करण्याच्या मागे भाजपच आहे का?'

congress| Sachin sawant| Politics| एक जबाबदार विरोधी पक्ष म्हणून भाजप काम करण्यास तयार नाही.
Sachin sawant | congress
Sachin sawant | congress

मुंबई : राज्यात भोंग्यांचा विषयावरुन राजकारण तापलं असतानाच आज (२५ एप्रिल) राज्य सरकारने सह्याद्री अतिथीगृहावर सर्वपक्षीय बैठक पार पडली. या सर्वपक्षीय बैठकीला शिवसेना (Shivsena), भाजप (BJP), राष्ट्रवादी कॉंग्रेस (NCP), कॉंग्रेस (Congress) यांच्यासह मनसे नेत्यांनाही आमंत्रित करण्यात आलं होतं. पण भाजप नेत्यांनी या बैठकीला दांडी मारली.

भाजप नेत्यांनी या बैठकीला उपस्थित न राहण्याचा निर्णय घेत राज्यसरकावर टिकाही केली.मात्र या टिकेला काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत (Sachin Sawant) यांनी पलटवार केला आहे. सचिन सावंत यांनी एक व्हिडीओ शेअर करत भाजप नेत्यांनी सर्वपक्षीय बैठकीला दांडी मारण्याच्या मुद्द्यावरुन ताशेरे ओढले आहेत.

Sachin sawant | congress
गोरे बंधूंची युती उघड... स्वाभिमानी जनतेने अभद्र युतीला नाकारले...

- काय म्हणाले सचिन सावंत?

''राज्यात कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी महाविकास आघाडी सरकारने सर्वपक्षीय बैठकीचा स्तुत्य उपक्रम हाती घेतला. पण या बैठकीला राज्यातला प्रमुख विरोधी पक्षाचा प्रतिनिधी नसणे यासारखी दुर्दैवी बाब असू शकत नाही. महाराष्ट्राला एक समृद्ध राजकीय परंपरेचा वारसा आहे. अनेकदा राज्याच्या हिताकरता, प्रगतीकरता किंवा काही कठीण प्रसंग आला असताना सरकार आणि राज्याच्या विरोधी पक्षाने एकत्र येऊन राज्याच्या हिताचे अनेक निर्णय घेतले आहेत, आणि गेल्या अनेक वर्षांपासून आपण हे पाहिलेलं आहे. हा इतिहास आहे.

परंतू राज्यासमोर कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न उभा राहिलेला असताना भाजप नेत्यांनी हात आखडता घेणं यासारखी वाईट बाब असू शकत नाही. एक जबाबदार विरोधी पक्ष म्हणून भाजप काम करण्यास तयार नाही, असा संदेश यातून देशासमोर जात आहे. गेल्या दोन अडीच वर्षांत भाजपच्या राजकारणातून सत्तापिपासूपणा दिसलेला आहे. सत्तेसाठी कुठल्याही स्तरावर जाण्याची त्याची भूमिका आहे.

एकदंरीतच राज्यात अशांतता व्हावी, राज्य सरकार अस्थिर व्हावं, या करता भाजप नेते सातत्याने प्रयत्न करताना दिसत आहेत, ही शंका राज्यातल्या जनतेच्या मनात आहे, आणि भाजप नेत्यांच्या या वागणूकीतून या शंकेला बळकटी मिळत आहे. म्हणून जे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करत आहेत, त्यांच्या पाठीशी भाजपच आहे का, ही देखील शंका आहे. म्हणून या सर्व प्रश्नांची उत्तरे भाजप नेत्यांनी देण्याची वेळ आली आहे. एक जबाबदार विरोधी पक्ष म्हणून भाजप आपली भूमिका पार पाडत नाहीये, ही महाराष्ट्रातील १२ कोटी जनतेची तक्रार आहे.''

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com