उद्धव ठाकरे यांना कधीही सत्तेचा अभ्यास नव्हता, पण राज्य सरकार...

Sachin Ahir | मातोश्री'वर झालेल्या बैठकीनंतर सचिन अहिर यांची राज्यसरकारवर टीका
Sachin Ahir
Sachin Ahir

मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना कधीही सत्तेचा अभ्यास नव्हता. शेतकऱ्यांकरिता कष्टकऱ्यांकरता हे सरकार काय निर्णय घेते, शिवसेनेची भूमिका सभागृहात मांडतील, अशी प्रतिक्रिया शिवसेना (Shivsena) आमदार सचिन अहिर यांनी दिली आहे. उद्धव ठाकरे यांनी काल मातोश्रीवर आमदारांची बैठक बोलावली होती. या बैठकीत उद्धव ठाकरे यांची महाप्रबोधन यात्रा, सर्वोच्च न्यायालयाचा निकाल, पावसाळी अधिवेशन आणि आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही बैठक होती.

या बैठकीनंतर सचिन अहिर यांनी माध्यमांशी संवाद साधला. सर्वोच्च न्यायालयात तारखांवर तारखा मिळतात त्याच्यावर चर्चा झाली. महाराष्ट्रातील अतिवृष्टी, मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकांच्या संदर्भातही चर्चा झाली. अतिवृष्टीत शेतकऱ्याला मदत कशी मिळेल, यावरही चर्चा झाली. उद्धव ठाकरे यांच्या यात्रेसंदर्भात अजूनही कोणतं नियोजन नाही, आम्हाला काही आदेश नाहीत. असही सचिन अहिर यांनी यावेळी सांगितलंं.

Sachin Ahir
Sonali Phogat Passes Away|भाजप नेत्या सोनाली फोगाट यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

तसचं, विधिमंडळात काय चाललंय याबद्दल आमदारांमध्ये चर्चा झाली, त्याचाही आढावा घेतला गेला. ओला दुष्काळ जाहीर व्हायला पाहिजे होता, पण शासन का मान्य होत नाही, याबाबत उद्धव ठाकरे यांनी आढावा घेतल्याचे सचिन अहिर यांनी सांगितले. राजकीय हस्तक्षेप करून निवडणुका पुढे घेऊन जात असतील महानगरपालिकेचे लोकप्रतिनिधी नसलणे घटनेप्रमाणे योग्य नाही, लोकांचा प्रतिनिधी नसणं हे देखील योग्य नाही, असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं.

शिवशंभू गोविंदा पथकाचा संदेश प्रकाश दळवी हा विलेपार्ले मध्ये जखमी झाला होता. मात्र सोमवारी उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. जांभोरी मैदानात ज्यांनी नियोजन केलं त्यांनी खाली गाद्या ठेवल्या नाहीत रुग्णवाहिकेची देखील व्यवस्था नव्हती. मंडळाच्या लोकांनी त्याला ऍडमिट केलं. दुर्दैवाने या जखमी गोविंदांकडे बिल मागितले जात आहे. लहान मुलांना घेता येत नाही तरी देखील अनेक गोविंदा पथकांमध्ये अनेक लहान मुलांचा समावेश होता. थरांची उंची देखील मर्यादित ठेवली पाहिजे होती मात्र ते देखील पाळलं नाही उंचीला स्पर्धा नका करू दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री यांच्या पक्षातला कोणीही या गोविंदांना जाऊन भेटून आला नाही, असा आरोपही सचिन अहिर यांनी केला.

जे हिंदुत्वासाठी आम्हाला सोडून गेले ते ब्र देखील काढत नाहीत. कोणताही लोकप्रतिनिधी आवाज उठवताना पाहायला मिळत नाही. गोविंदामध्ये अफजलखानाचा वध चित्र दाखवण्याचा प्रयत्न केला. मग फक्त गणेशोत्सवातच अफजलखान वधाच्या देखाव्याला बंदी का, फक्त पुण्यात नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात देखील परवानगी दिली जात नाही, असा सवालही सचिन अहिर यांनी उपस्थित केला. तसेच शासनाला मार्गदर्शक तत्व निर्माण करण्याची गरज असल्याचे म्हटले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com