वसंत मोरेंना रुपाली ठोंबरे पाटलांचे निमंत्रणच

Raj thackeray| Vasant More| Political news| पुण्याचे शहराध्यक्ष वसंत मोरे यांनी राज ठाकरेंच्या आदेशाचे पुण्यात पालन होणार नसल्याचे स्पष्ट केले
Vasant More- Rupali thombare patil
Vasant More- Rupali thombare patil sarkarnama

पुणे : बहीण म्हणून मी वसंत मोरे (Vasant More) यांच्या पाठीशी आहे. त्यांनी घेतलेली भूमिका योग्यच आहे. कारण ते लोकप्रतिनिधी आहेत. असे म्हणत राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्या रुपाली ठोंबरे पाटील यांनी मनसे नेते रुपाली वसंत मोरे यांनी पाठराखण केली आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (Maharashtra Navnirman Sena) अध्यक्ष राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) यांनी गुढीपाडवा मेळाव्यात मशिदीच्या समोरील भोंगे न उतरवल्यास समोर दुप्पट आवाजात हनुमान चालीसा लावा, अशा भूमिका घेतली. मात्र राज ठाकरे यांचा हा आदेश मनसेचे पुण्याचे शहराध्यक्ष वसंत मोरे यांनी राज ठाकरेंच्या आदेशाचे पुण्यात पालन होणार नसल्याचे स्पष्ट केले. सध्या रमजान सुरू आहे. त्यामुळे माझ्या प्रभागात मला शांतता हवी आहे. म्हणून असे कोणतेही पाऊल उचलणार नाही. काही अनधिकृत गोष्टी असल्यास राज्य सरकारने त्यावर कारवाई करावी, असेही त्यांनी सांगितले आहे.

Vasant More- Rupali thombare patil
सदावर्ते अन् ST कामगारांची हार; कामावर रुजू होण्यासाठी न्यायालयाचा अल्टिमेटम

वसंत मोरे यांच्या या भूमिकेवर रुपाली ठोंबरे पाटील यांनी त्यांची पाठराखण करत वसंत मोरे आणि साईनाथ बाबर यांना अप्रत्यक्षरित्या निमंत्रणच दिले आहे. इतकेच नव्हे तर त्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावरही निशाणा साधला आहे.

गुडी पाडव्याला राज ठाकरेंची जी सभा झाली ती भाजपाची होती. राज ठाकरेंनी यू-टर्न घेतील असे कोणालाही वाटले नव्हते. राज ठाकरे म्हणाले, की शरद पवारांमुळे जातीवाद वाढला. असे असते तर हसन मुश्नीफ, जितेंद्र आव्हाड, धनंजय मुंडे मंत्री झाले असते का, असा सवाल त्यांनी राज ठाकरेंना विचारला. भाजपाने राज ठाकरेंना बोलायला लावले. हे सर्व भाजपाने घडवून आणले असल्याची टीका रुपाली पाटील यांनी केली.

Vasant More- Rupali thombare patil
ST Strike : वकिलपत्र काढल्यानंतर सदावर्ते यांची पवार व परब यांच्यावरच टीका

दरम्यान, राज ठाकरेंच्या गुडी पाडव्याच्या भाषणानंतर नाराज झालेल्या मनसेच्या काही मुस्लीम कार्यकर्त्यांनी आपले राजीनामे दिले. वसंत मोरेंनी या कार्यकर्त्यांची भेट घेत फेसबुक पोस्ट लिहीली. एखाद्या किल्ल्याचे बुरूज ढासाळायला लागले ना, की किल्ला पडायलाही वेळ लागत नाही, असे त्यांनी म्हटले. त्यांच्या या विधानांनी राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क काढले जात आहेत.

तर, मनसे प्रदेश सरचिटणीस हेमंत संभूस यांनी वसंत मोरेंच्या भूमिकेला जाहीर विरोध केला. मोरे यांचा वैचारिक गोंधळ झाला असून त्यांनी घेतलेली भूमिका ही पक्षाची भूमिका नाही, असे म्हटले आहे. याचाच अर्थ पुण्यात मनसे कार्यकर्त्यांमध्ये सरळसरळ दोन गट पडल्याचे दिसत आहे. या घडामोडी पाहता राष्ट्रवादीने तर अप्रत्यक्ष पाठिंबा देत आमंत्रणच दिल्याची चर्चा आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com