Rupali Chakankar : महिलांबाबत वादग्रस्त विधान करणाऱ्या बाबा रामदेव यांना महिला आयोगाचा दणका

Rupali Chakankar : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केलेल्या वक्तव्याचा वाद सुरु असतानाच आता बाबा रामदेव बाबा यांनी हे वादग्रस्त आणि आक्षेपार्ह वक्तव्य केले आहे.
Rupali Chakankar, Baba Ramdev
Rupali Chakankar, Baba Ramdevsarkarnama

Rupali Chakankar : "महिला साडी नेसल्यावर, सलवार कुर्त्यावरही चांगल्या दिसतात. काही नाही घातलं तरी चांगल्या दिसतात," असे विधान बाबा रामदेव यांनी नुकतेच ठाण्यात केलं. या विधानानंतर बाबा रामदेव यांच्यावर सर्व स्तरातून टीका होत आहे. बाबा रामदेव यांच्या वक्तव्यावरून राज्य महिला आयोग आक्रमक झाला आहे. (Rupali Chakankar latest news)

बाबा रामदेव यांच्यावर या प्रकरणी महिला आयोगाने रामदेव बाबांना नोटिस पाठवली आहे, तीन दिवसात याबाबत खुलासा करावा, असे आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी या नोटिसमध्ये म्हटलं आहे.

Rupali Chakankar, Baba Ramdev
Ajit Pawar : शिंदे आता कुणाचा बळी द्यायला गुवाहाटीला जाताहेत.. ; अजितदादांचा टोमणा

आपण केलेल्या विधानामुळे महिलांची प्रतिष्ठा आणि सन्मान दुखावला गेला आहे, समाजमाध्यमांवर आपल्या या विधानावर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत. आपल्या विरोधात याबाबत तक्रारी आल्या आहेत, याबाबत आपण तीन दिवसात स्पष्टीकरण द्यावे, असे महिला आयोगाने बाबा रामदेव यांना पाठवलेल्या नोटिशीमध्ये म्हटलं आहे. बाबा रामदेव यांनी महिलांबाबत केलेल्या या विधानाची गंभीर दखल आयोगाने घेतली आहे.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केलेल्या वक्तव्याचा वाद सुरु असतानाच आता बाबा रामदेव बाबा यांनी हे वादग्रस्त आणि आक्षेपार्ह वक्तव्य केले आहे. महिला साडी, सलवार सूटमध्ये तर चांगल्या दिसतातच. पण माझ्यासारखे त्यांनी काही नाही घातले तरी त्या छान दिसतात, असे वक्तव्य त्यांनी केलेय. ठाण्यातील हायलँड मैदानात रामदेव बाबा यांनी योगाचे धडे दिले. यावेळीच त्यांनी हे वक्तव्य केले. विशेष म्हणजे या कार्यक्रमाला हजारोंच्या संख्येने भाविक उपस्थित होते.

Rupali Chakankar, Baba Ramdev
Thackeray group : कर्नाटकच्या बसला काळे फासले ; ठाकरे गट आक्रमक

ठाण्यात पतंजली योग समिती, भारत स्वाभिमान तर्फे शुक्रवारी मोफत योग शिबिराचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस उपस्थित होत्या. यावेळी दीपाली सय्यद, आमदार रवी राणा यांनीही मंचावर हजेरी लावली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com