मोठी बातमी : रूपाली चाकणकर यांचा राजीनामा

Rupali Chakankar यांच्या जागी कोणाची नियुक्ती होणार, याची उत्सुकता
Rupali Chakankar, .jpg
Rupali Chakankar, .jpgsarkarnama

मुंबई : महिला राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा म्हणून रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. महिला आयोगाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी घेतल्याने पक्षाच्या पदाची सूत्रे त्यांनी सोडली असल्याचे सांगण्यात आले.

चाकणकर यांच्या जागी आता राष्ट्रवादी काॅंग्रेस कोणाला संधी देणार, याची उत्सुकता आहे. चाकणकर यांनी पुण्याच्या महिला राष्ट्रवादीच्या अध्यक्षा म्हणून काम पाहत होत्या. त्यानंतर त्यांना प्रदेश महिला राष्ट्रवादीच्या उपाध्यक्षा म्हणून संधी मिळाली. राज्यात 2019 च्या विधासभा निवडणुकीच्या वेळी महिला राष्ट्रवादीच्या तत्कालीन प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी अचानक राजीनामा दिल्याने तेथे चाकणकर यांना संधी मिळाली.

Rupali Chakankar, .jpg
मला बुजगावणे म्हणून विधानसभेत पाठवलेले नाही : चेतन तुपेंचा इशारा

त्यानंतर चित्रा वाघ विरुद्ध चाकणकर यांच्यातील राजकीय वाद राज्यभर रंगला होता. सुरवातीला वाघ यांच्या सहकारी म्हणून काम पाहणाऱ्या रुपाली चाकणकर या नंतर त्यांच्यावर जोरदार टीका करू लागल्या. महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यानंतर चाकणकर यांना राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाची संधी मिळाली. हे पद अर्धन्यायिक स्वरूपाचे असल्याने या पदावरील व्यक्तींनी पक्ष संघटनेत राहावे का, अशी नेहमीच चर्चा असते. त्यांनी आता संघटनेचे पद सोडले आहे. आता त्यांच्या जागी कोणाला महिला राष्ट्रवादीचे नेतृत्व करण्याची संधी मिळणार, याकडे लक्ष राहणार आहे.

Rupali Chakankar, .jpg
Video: "कुटुंबीयांना राज्याबाहेर ठेवून राजकारण करण्याची वेळ आली आहे", जितेंद्र आव्हाड

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com