Rupali Chakankar On Ardhapur Case: अर्धापूर बलात्कार प्रकरणात पोलीस पाटील-उपसरपंचांशी संबंधित लोक असल्याचा आरोप

Nanded Ardhapur : संबंधित पोलिस अधिकाऱ्याला निलंबित करा..
Rupali Chakankar
Rupali Chakankar Sarkarnama

Rupali Chakankar News: राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी नांदेड जिल्ह्याच्या अर्धापूर येथील एका गंभीर घटनेबाबत ट्वीट करत संताप व्यक्त केला आहे. अर्धापूर येथील एका शेतमजूर असलेल्या कुटुंबातील एका विवाहित महिलेवर जीवे मारण्याची धमकी देवून, संबंधित महिलेवर वर्षभर बलात्कारचीकरण्यात आल्याची गंभीर घटना घडल्याचे चाकणकरांनी म्हंटले आहे. या घटनेबाबात ट्वीट करताना त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्याचे पोलिस महासंचालक, जिल्हाधिकारी तसेच नांदेड पोलिसांना टॅग केले आहे. यावर लवकरात लवकर कारवाई करण्याची चाकणकरांनी मागणी केली आहे,

संबंधित महिलेवर बलात्काराच्या प्रकरणात स्थानिक पोलिस पाटील आणि उपसरपंच यांच्या कुटुंबातील लोकच सहभागी असल्याचा गंभीर आरोप केले असून, यात पोलिसांनी हलगर्जीपणा केला आहे. तसेच संबंधित महिलेने वर्षभर मदत मागूनही, तक्रार दाखल करण्याची याचना करूनही पोलिसांनी दुर्लक्ष केले आहे. संबंधित पोलिस अधिकाऱ्याला निलंबित करण्याची मागणाही चाकणकरांनी केली आहे.

चाकणकर म्हणाले, "नांदेडच्या अर्धापूरमध्ये शेतमजूर असलेल्या कुटुंबातील विवाहित महिलेला आणि तिच्या मुलाला जीवे मारण्याची धमकी देऊन जवळपास वर्षभर महिलेवर सामूहिक बलात्कार केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. पिडित महिलेवरील बलात्काराचा व्हिडिओ वायरल करण्याची भिती घालून दुसऱ्या आरोपींकडून पुन्हा बलात्कार,अशी अतिशय हीन घटना सतत घडत राहिली.यातील पिडितेने वर्षभर पोलीसांना मदत मागूनही पोलीसांनी कुठलीच कारवाई केलेली नाही.

Rupali Chakankar
Maharashtra Politics : उद्धव ठाकरेंना केलेल्या फोनबाबत पंकजा मुंडेंनी सोडलं मौन; म्हणाल्या...

पोलीस पाटील आणि उपसरपंच यांच्या कुटुंबातील लोक यात सहभागी आहेत.पोलीसांनी यात काहीच कारवाई न केल्याचा प्रकार अतिशय संतापजनक आहे.पोलीस अधीक्षक,नांदेड यांनी याबाबत तातडीने कारवाई करत आरोपींना अटक करावी. तसेच वर्षभर महिलेची तक्रार न घेणाऱ्या सर्व संबंधित पोलीसांवर ही कारवाई करावी असे निर्देश आयोगाकडून देण्यात आले आहेत, असे चाकणकरांनी ट्वीट करत म्हंटले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com