'देशभरातील दंगलीमागे केंद्रातील सत्ताधारी पक्षाचा हात'- राऊतांचा आरोप

Delhi Crime news| Sanjay Raut|फोडा आणि झोडा असं ब्रिटिशनीतीचं राजकारण केंद्रातील राजकारण सुरू
'देशभरातील दंगलीमागे केंद्रातील सत्ताधारी पक्षाचा हात'- राऊतांचा आरोप

मुंबई : 'देशात रामनवमी, हनुमान जयंतीला कधीही दंगे झाले नाहीत, लोकांनी हे सण शांततेत साजरे केले, पण दिल्लीत काही दिवसांपासून दंगली सुरु आहेत. कारण दिल्लीत स्थानिक निवडणूका होणार आहेत, त्या निवडणूकांवर भाजपचे लक्ष आहे. दिल्लीत केंद्रशासित राज्य आहे. असे असतानाही नियोजित निवडणूका (Elections) आधीपुढे ढकलण्यात आल्या आणि आता दंगलीचे वातावरण तयार केले जात आहे, हे सगळं त्या निवडणुका जिंकण्यासाठी सुरू आहे. म्हणून दिल्लीत दंगे सत्ताधारी पक्षानं प्रायोजित केले आहेत”, असा आरोपही संजय राऊत (sanjay Raut) म्हणाले.

आज सकाळी माध्यमाशी संवाद साधताना संजय राऊतांनी केंद्रसरकारवर निशाणा साधला आहे. देशातील दोन प्रमुख शहरांमध्ये आणि इतर मोठ्या शहरामंध्ये ज्याप्रकारे दंगलीचे वातावरण तयार करण्यात आले आहे, हे अत्यंत दुर्दैवी आहे. देशाच्या राजधानीत दंगे होत आहे. हे पहिल्यांदाच घडत नाही.दिल्लीत स्थानिक निवडणुका होणार आहेत. पण दिल्लीतील स्थानिक निवडणूकांच्या पार्श्वभुमीवर या दंगली घडवून आणल्या जात आहेत. असा आरोपही संजय राऊत यांनी केला आहे.

'देशभरातील दंगलीमागे केंद्रातील सत्ताधारी पक्षाचा हात'- राऊतांचा आरोप
राज ठाकरेंचा मेगा प्लॅन; राज्यभरात महाआरती अन् अयोध्येसाठी १० ते १२ रेल्वे भरुन मनसैनिक!

मुंबईतही हाच तणाव निर्माण केला आहे. मुंबईत तुमची ताकद नाही म्हणून तुम्ही कोणाला तरी पकडून भोंग्यांचा मुद्दा उपस्थित करुन तणाव निर्माण करण्याचे काम केले जात आहे, असे म्हणत राज ठाकरेंना अप्रत्यक्ष टोलाही लगावला. देशात असेच वातावरण राहिले तर देशाच्या अर्थव्यवस्थेवर याचे गंभीर परिणाम होऊ शकतात. आधीच कोरोना महामारीमुळे उद्धवस्त झालेली अर्थव्यवस्था काहीशी सुधारत असताना, लोक कामावर जात असताना, उद्योग व्यवसाय सुरु झालेले असताना परच देशात अशा दंगली केल्या जात आहेत, ही परिस्थिती अशीच राहिली तर देशाची अर्थव्यवस्था श्रीलंका, युक्रेनपेक्षा खराब होईल, अशी भिती संजय राऊत यांनी व्यक्त केली आहे.

भाजपाकडून ब्रिटिशनीती राबवली आहे. आम्ही महाविकास आघाडी म्हणून जिथे शक्य आहे तिथे एकत्र लढलो आणि हा महाराष्ट्रात हा फॉर्म्युला यशस्वी झाला. ज्यांना फॉर्म्युल्याची भिती वाटत होती. त्यांनी दंगलीच्या माध्यमातून लोकांमध्ये द्वेष निर्माण केला जात आहे. अशा पद्धतीचं फोडा आणि झोडा असं ब्रिटिशनीतीचं राजकारण केंद्रातील राजकारण सुरू आहे. पण महाराष्ट्राची जनता त्यांना भीक घालणार नाही”, असं राऊत म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com