ठाकरे सरकार खड्ड्यात गेल्याशिवाय राहणार नाही

केंद्रीयमंत्री रामदास आठवले (Ramdas Athavale) यांनी महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे. ते उल्हासनगर (Ulhasnagar) येथे आले होते.
(Ramdas Athavale)
(Ramdas Athavale)sarkarnama

उल्हासनगर : राज्यातील खड्ड्यांवरून केंद्रीयमंत्री रामदास आठवले (Ramdas Athavale) यांनी महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (Republican Party of India) पक्षाच्या ६४ व्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमासाठी आठवले हे उल्हासनगर (Ulhasnagar) येथे आले होते. त्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते.

रामदास आठवले म्हणाले, ''राज्यात खड्याचे साम्राज्य आहे. हे खड्यांचे सरकार आहे, सरकारने रस्त्यांवरील खड्डे बुझवले नाही तर हे सरकार खड्ड्यात गेल्याशिवाय राहणार नाही. म्हणून या सरकारने राज्यातील रस्त्यावर पडलेले खड्डे लवकरात लवकर भरावे''

राज्यातील खड्ड्यांवरून विरोधक आणि सत्ताधारी यांच्यात युद्ध रंगलेलं पाहायला मिळेल आहे. भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी मुंबईतील रस्त्यांवरील खड्ड्यांवरून मुंबई महानगरपालिकेवर ताशेरे ओढले आहेत. मुंबईतील सुमारे २ हजार किमीच्या रस्त्यावर केवळ ९२७ खड्डे आहेत असे महापालिका सांगते आहे. मग खड्डे भरण्यासाठी जे ४८ कोटींची तरतूद केली ती याच ९२७ खड्यांसाठी का ? असा उपरोधिक सवाल करीत शेलारांनी नुकताच उपस्थित केला होता.

(Ramdas Athavale)
युवासेनेचे नेते सरदेसाईंनी केलं सर्वच पक्षाच्या युवा संघटनांना आवाहन

मुंबई महापालिकेने खड्ड्याबाबत जे पोर्टल तयार केले त्यावर केवळ ९२७ खड्डे असल्याचे नमूद झाले आहे. खड्डे बुजवण्यासाठी ४८ कोटींचा निधी मंजूर करण्यात आला. मग तो या ९२७ खड्यांसाठीच होता का? असा सवाल ही आमदार शेलार यांनी नुकताच महापालिकेला केला. यामध्ये मोठा भ्रष्टाचार आहे त्याची चौकशी सुरु आहे, असे सांगतानाच चौकशीत सत्य समोर येईलच, असेही ते म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com