Prajakta Mali : राज ठाकरेंच समर्थन करणं प्राजक्ताला पडणार महागात?

अभिनेत्री प्राजक्ता माळी यांच्यावर राज्य सरकारने कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी सचिन खरात यांनी केली आहे.
Sachin Kharat, Prajakta Mali Post
Sachin Kharat, Prajakta Mali PostSarkarnama

पुणे : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) हे मशिदींवरील भोंग्यावरून चांगलेच आक्रमक झाले असून भोंगे उतरवण्यासाठी त्यांनी 4 मे चा अल्टिमेटम दिला. त्यामुळे चांगलेच वातावरण तापले आहे. औरंगाबाद येथे केलेल्या भाषणावर पोलिसांकडून कारवाईचे संकेत मिळत असताना मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळी हिने उद्यापासून गोंगाट बंद होईल,अशी अपेक्षा बाळगते, असे ट्विट करून आपल्या मनातील भावना व्यक्त केली. मात्र, यावरून ट्रोल होताच लगेचच त्यांनी हे ट्विट डिलीट केले होते. मात्र, डिलीट केलेली पोस्ट राज ठाकरे यांच्या चिथावणीखोर भाषणाचे समर्थन करत असल्याने ही पोस्ट तपासून राज्य सरकारने कायदेशीर प्राजक्तावर कारवाई करावी, अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (खरात) अध्यक्ष सचिन खरात (Sachin Kharat) यांनी केली आहे.

Sachin Kharat, Prajakta Mali Post
राज ठाकरेंवर गुन्हा दाखल; मनसेचे प्रमुख नेते नॉट रिचेबल : पोलिसांचा मोठा बंदोबस्त

सचिन खरात म्हणाले, राज ठाकरे यांनी औरंगाबाद चिथावणीखोर भाषण केलं तरीसुद्धा प्राजक्ता माळी यांनी राज ठाकरे यांच्या भाषणाची पोस्ट करून समर्थन केले आहे. प्राजक्ता माळी आपण क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्यामुळे शिक्षण घेतलं व आज लोकप्रिय कलाकार झाला. परंतु आपण पोस्टमध्ये म्हणता आपल्याला राज ठाकरेंच भाषण पाहून अंगावर स्पुरण चढलय आणि 3 तारखेला गोंगाट बंद होईल, अशी आशा बाळगते. अशी पोस्ट लिहली आहे. त्यामुळे कलाकार प्राजक्ता माळी यांची पोस्ट तपासून राज्य सरकारने त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी तसेच, सोनी चॅनेलने या पोस्टची दखल घेऊन त्यांना 'महाराष्ट्राची हास्य जत्रा' या कार्यक्रमामधून काढावे, अशी मागणी खरात यांनी राज्य सरकारकडे केली आहे.

Sachin Kharat, Prajakta Mali Post
मशिदींवरील भोंगे उतरवण्यासाठी पुढे याल तर खबरदार; रामदास आठवलेंचा इशारा

प्राजक्ता आपल्या ट्विटमध्ये म्हणाली होती की, सगळ्यांना सुख, समाधान, ऐश्वर्य अक्षय्य राहो, हीच प्रार्थना. सगळ्यांना अक्षय्य तृतीयेच्या तसेच मुस्लिम बांधवांना ईदच्या मनापासून शुभेच्छा. असो....आज 3 तारिख, उद्यापासून गोंगाट बंद होईल, अशी आशा बाळगते. # शांतताप्रिय धन्यवाद मा. श्री राज ठाकरे@raj_shrikant_thackeray, असे ट्विट केले होते. दरम्यान, खरात यांनी प्राजक्तावर केलेल्या कारवाईच्या मागणीवर राज्य सरकार काय कारवाई करणार हे बघणे महत्वाचे ठरणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Sarkarnama
www.sarkarnama.in