'कायद्याच्या कचाट्यात अडकल्याने नवनीत राणांना आता जात आठवली'

आरपीआयचे नेते (खरात) सचिन खरात यांनी खासदार नवनीत राणा यांच्यावर टीका केली आहे.
Navneet Rana, Sachin Kharat
Navneet Rana, Sachin KharatSarkarnama

मुंबई : 'मातोश्री' विरोधात पंगा घेणाऱ्या अमरावती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार नवनीत राणा (Navneet Rana) आणि त्यांचे पती आमदार रवी राणा (Ravi Rana) यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली असून त्यांच्यावर राजद्रोहाचा गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे. मात्र, आपण मागासवर्गीय असल्याने आपल्याला पोलिसांनी पाणी दिले नाही, असा आरोप तुरूगांत असलेल्या नवनीत राणा यांनी केला आहे. यावर आरपीआय (RPI) (खरात) चे राष्ट्रीय अध्यक्ष सचिन खरात (Sachin Kharat) यांनी त्यांच्यावर टीका केली असून नवनीत राणा या कायद्याच्या कचाट्यात अडकल्यामुळे आता त्यांना जात आठवली असून. तुमचं ढोंगी राजकारण जनतेने ओळखलं आहे. आता तुम्हाला अमरावती मधील जनता पुन्हा निवडून देणार नाही, अशी टीका खरात यांनी केली आहे.

Navneet Rana, Sachin Kharat
अखेर सत्य समोर! संजय पांडेंनी नवनीत राणांचा व्हिडीओ केला व्हायरल

खरात म्हणाले, संविधाननिर्माता डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दलित, शोषित समाजाला इतर समाजाच्या बरोबरीने येण्यासाठी आरक्षण दिले. परंतु याच आरक्षित जागेवर नवनीत राणा निवडून येऊन दलित समाजाचे प्रश्न सोडविण्याऐवजी धार्मिक राजकारण करत असून धर्माचे अवडंबर करत आहे. हे संविधानाला अभिप्रेत नाही. परंतु ज्यावेळेस त्या कायद्याच्या कचाट्याच सापडल्या त्यावेळी आता त्यांना जात आणि समाज आठवत आहे. त्यामुळे हे तुमचे ढोंगी राजकारण अमरावती मधील नागरिकांनी ओळखले आहे. त्यामुळे अमरावती मधील जनता तुम्हाला पुन्हा खासदार म्हणून निवडून देणार नाही हे ध्यानात ठेवा, अशा शब्दात खरात यांनी नवनीत राणा यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

Navneet Rana, Sachin Kharat
सोमय्यांवर पुन्हा हल्ला झाल्यास 'शुट अ‍ॅट साईट'? वळसे पाटलांनी स्पष्टचं सांगितले...

दरम्यान, आपण मागास वर्गातील असल्यामुळे तुरुंगात हीन दर्जाची वागणूक दिली जात असल्याचा आरोप नवनीत राणांनी केला आहे. याबाबत त्यांनी थेट लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र लिहिले होते. या पत्रावर लोकसभा सचिवालयाने केंद्रीय गृहमंत्रालयाला आदेश देऊन 24 तासांत अहवाल सादर करण्यास सांगितले आहे. तर नवनीत राणा या मागासवर्गीय आहेत म्हणून त्यांना पोलिसांनी पाणी दिले नाही, या दाव्याची राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी खिल्ली उडवत पोलखोल केली आहे. ते म्हणाले, सरकारमध्ये व पोलिसांत मागासवर्गीय नाहीत का? राणा मागासवर्गीय आहेत की नाही हा विषय तर न्यायालयात गेलेला आहे, अशा शब्दात त्यांनी नवनीत राणा यांची खिल्ली उडवली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com