Former Mayor On Roshni Shinde Case: रोशनी शिंदेंना मारहाण झालीच नाही; ठाण्याच्या माजी महापौरांचा मोठा खुलासा

ठाण्यात ठाकरे गटाच्या कार्यकर्त्या रोशनी शिंदे यांना शिंदे गटाच्या महिला कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याचा प्रकार घडला.
Shinde-Thackeray Politics:
Shinde-Thackeray Politics: Sarkarnama

Thane News: ठाण्यात ठाकरे गटाच्या कार्यकर्त्या रोशनी शिंदे यांना शिंदे गटाच्या महिला कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याचा प्रकार घडला. या मारहाणीत रोशनी शिंदे यांना गंभीर दुखापत झाली आहे.त्यांच्यावर सध्या उपचार सुरु आहेत. रश्मी आता उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यादेखील रोशनी शिंदे यांची भेट घेण्यासाठी जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. अशातच या प्रकरणी ठाण्याच्या माजी महापौर मिनाक्षी शिंदे यांनी पत्रकार परिषद घेत या प्रकरणावर खुलासा केला आहे.

रोशनी शिंदे यांच्या काही आक्षेपार्ह पोस्टवरुन आमच्या महिला तिला फक्त समज द्यायला गेल्या होत्या. तिच्या दोन दिवसांपूर्वीच्या फेसबुक पोस्ट पाहिल्या तर ती नाचताना दिसत आहे. रोशनी शिंदे या गर्भवती नाहीत. जर कोणाला मारहाण झाली असेल तर रुग्णालयात एमएनसी रिपोर्ट काढला जातो. या रिपोर्टनुसार ती गर्भवती नाही. पण ठाण्यातील खासदार एका महिलेच्या खांद्यावर बंदूक ठेवून राजकारण केलं जात आहे.

Shinde-Thackeray Politics:
Market Committee Election : माढ्यात शिंदे बंधूंच्या एकहाती वर्चस्वाला सावंत बंधूंचे कडवे आव्हान : संजय शिंदे, कोकाटेंसह दिग्गजांनी भरले अर्ज

हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना अडकवण्यासाठी हा कट रचला जात असल्याचा दावा मिनाक्षी शिंदे यांनी केला आहे. इतकचं नव्हे तर, तुमच्यात पुरषार्थ उरला असेल तर स्वत: रस्त्यावर उतरा, असे आव्हानही शिंदे यांनी दिलं आहे. तसेच, रोशनी शिंदे यांनी एकनाथ शिंदे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल आक्षेपार्ह विधानं केली म्हणून आमच्या महिला तिला समजवायला गेल्या होत्या.त्यानंतरही ती स्वत:हून रुग्णालयात दाखल झाली.घटनेनंतर चार-पाच तासांनी तिची प्रकृती गंभीर होते.हे कसं शक्य आहे.

खासदार राजन विचारे यांनी तिला रुग्णालयात दाखल करुन ठेवलं. मुख्यमंत्री शिंदेंना या प्रकरणात अडकवण्यासाठी हे आरोप केले जात आहेत. हे प्रकरण खोटं प्रकरण रचण्यात आलं आहे. यापूर्वी ज्यांनी उद्धव ठाकरेंसाठी प्राण गमावले त्यांच्यासाठी ते कधीही रुग्णालयात पोहचले नाहीत, मग आताच कसे येतायेत, असा सवालही शिंदे यांनी उपस्थित केला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com