Rohit Pawar: ''नाहीतरी वाघांना सुरक्षेची गरज काय?''; रोहित पवारांचा आमदारांच्या सुरक्षेवरुन खोचक टोला

Rohit Pawar On Shinde group MLA's Security : गरज असलेल्यांना जरूर सुरक्षा द्या, पण...
MLA Rohit Pawar
MLA Rohit PawarSarkarnama

Rohit Pawar On Shinde group MLA's Security : राज्यात जून महिन्यांत सत्तांतर झाल्यानंतर शिंदे फडणवीस सरकार सत्तेत आले. यानंतर या सरकारने सेलेब्रिटी आणि राजकीय नेत्यांच्या सुरक्षेत मोठी वाढ करण्याचा निर्णय घेतला. तसेच शिंदे गटाच्या आमदारांना देखील वाय प्लस सुरक्षा पुरविण्यात आली आहे. यावरुन विरोधकांकडून सत्ताधार्यांवर कायमच टीका केली जाते.

तसेच हिवाळी अधिवेशनात देखील शिंदे गटातील आमदारांच्या सुरक्षेचा मुद्दा गाजला होता. आता याच सुरक्षेवरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी शिंदे सरकारवर निशाणा साधला आहे.

कर्जत जामखेड मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार यांनी टि्वट केलं आहे. या टि्वटमध्ये पवार यांनी आमदार धनंजय मुंडे यांचा शिंदे गटातील आमदारांच्या सुरक्षेविषयीचा सभागृहातील व्हिडीओ शेअर केला आहे. यावेळी पवार यांनी याच व्हिडीओचा संदर्भ देत बाळासाहेबांची शिवसेनेतील आमदारांच्या सुरक्षेवर भाष्य केलं आहे.

MLA Rohit Pawar
Nana Patole : भाजप पाठोपाठ काँग्रेसनेही बारामतीत लक्ष घातले....

सत्ताधारी आमदारांच्या खर्चाची आकडेवारीच आमदार रोहित पवार यांनी टि्वटद्वारे मांडली आहे. पवार म्हणाले, राज्यात एकाच गटाच्या ४० आमदारांसह सत्ताधारी पक्षाच्या सुमारे ६० आमदारांच्या Y+ सुरक्षेचा खर्च दरमहा १२ कोटी म्हणजे वर्षाचा १४४ कोटी होतोय, तर १२ खासदारांच्या सुरक्षेचा खर्च दरमहा सुमारे अडीच कोटी असा वर्षाचा एकूण खर्च सुमारे दीडशे कोटी होतो असं म्हटलं आहे.

MLA Rohit Pawar
Ajit Pawar: ''...म्हणून अजित पवारांना भारतात राहण्याचा अधिकार नाही, त्यांना पाकिस्तानात पाठवा!''

याचवेळी एवढ्या निधीतून अंगणवाडी सेविका, संगणक परिचालक यांपैकी एखाद्या घटकाला न्याय देता आला असता किंवा विद्यार्थ्यांची थकीत शिष्यवृत्ती देता आली असती. त्यामुळं गरज असलेल्यांना जरूर सुरक्षा द्या, पण अनावश्यक उधळपट्टी टाळून तिजोरीचीही सुरक्षा करा अशा शब्दांत शिंदे सरकारला सुनावलं आहे. तसेच नाहीतरी वाघांना सुरक्षेची काय गरज आहे? असा टोलाही शिंदे गटातील आमदारांना लगावला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in