Rohit Pawar : राम शिंदे पुड्या सोडू नका, खेकड्याची चाल लोक स्विकारत नाही : रोहित पवारांचा पलटवार!

Rohit Pawar : हिमंत असेल तर याचा पुरावा द्या.
Ram Shinde Vs Rohit Pawar
Ram Shinde Vs Rohit PawarSarkarnama

मुंबई : राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी भाजप नेते व आमदार राम शिंदे (Ram Shine) यांना जोरदार प्रत्यु्त्तर दिले आहे. शिंदे यांनी नुकतंच रोहित पवारांवर आरोप केले होते. माझ्या मतदारसंघात येऊ नका, म्हणून आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांना पवारांनी दहा फोन केले होते, असा दावा राम शिंदे यांनी केला होता. यालाच आता रोहित पवारांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.

Ram Shinde Vs Rohit Pawar
Chhagan Bhujbal : सुरक्षा काढणे योग्य नाही, सरकारने पुनर्विचार करावा : भुजबळांची मागणी!

शिंदे साहेब उगाच पुड्या सोडू नका. खेकड्याची चाल लोक स्विकारत नाहीत. हिंमत असेल तर पुरावा द्या, असे आव्हान रोहित पवार यांनी दिले. ज्याला पैसा आणि अहंकाराची खाज आहे, ज्याला हाफकीन ही संस्था आहे की व्यक्ती हे ही माहिती नाही. जो महाराष्ट्राला भिकारी बनवण्यीची भाषा करतो, अशा व्यक्तिला मतदारसंघात न येण्यसाठी मी कशाला मस्का लावू? असे ट्विट रोहित पवारांनी

राम शिंदे साहेब पुड्या सोडू नका. खेकड्याची चाल लोक स्विकारत नाहीत. हिमंत असेल तर याचा पुरावा द्या.आणि यापुढे तुमच्याच प्रचाराला त्यांनी जरूर बोलवा, मग मैदानात बघू , अशा शब्दात रोहित पवार यांनी जोरदार शब्दात पलटवार केला आहे.

Ram Shinde Vs Rohit Pawar
Nana Patole : शिंदे-फडणवीस सरकार हे गुजरातचे एजंट ; नाना पटोलेंची घणाघाती टीका!

दरम्यान राम शिंदे यांनी रोहित पवाराबद्दल काही दावा केला होता. आपल्या मतदारसंघात येऊ नये म्हणून रोहित पवार यांनी राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सांवंत यांना दहावेळा फोन केले होते, असा दावा शिंदे यांनी केला होता. यालाच प्रत्युत्तर देताना रोहित पवार यांनी ट्विटच्या माध्यमातून जोरदार पलटवार केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com