शिवसेनेच्या ठाकरे गटाकडूव ऋतुजा लटकेंचा उमेदवारी अर्ज दाखल

आता शिवसेनेच्या ऋतुजा लटके आणि भाजपचे मुरजी पटेल हा सामना पाहायला मिळणार आहे.
शिवसेनेच्या ठाकरे गटाकडूव ऋतुजा लटकेंचा उमेदवारी अर्ज दाखल

मुंबई : महापालिकेने ऋतुजा लटके यांचा राजीनामा मंजूर केल्यानंतर अखेर त्यांनी अंधेरी विधानसभेच्या पोटनिवडणूकीसाठी उमेदवारी अर्ज भरला. यावेळी शिवसेनेकडून मोठे शक्तिप्रदर्शन करण्यात आले. लटके यांच्यासोबत यावेळी युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे, अनिल परब, खासदार प्रियंका चतुर्वेदी उपस्थित होत्या. उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आलेल्या दोन्ही गटांकडून मोठी वातावरण निर्मीती करण्यात आली होती.

महापालिकेकडून ऋतुजा लटके यांचा राजीनामा मंजूर करण्यात वेळकाढूपणा होत होता. याविरोधात त्यांनी न्यायालयात धाव घेतली. अखेर न्यायालयीन लढाईनंतर महापालिकेने ऋतुजा लटके यांचा राजीनामा मंजूर केला. त्यांच्या राजीनामा मंजूरीचं पत्र मिळाल्यानंतर त्यांनी राजीनाम्याचं पत्र हाती आल्यानंतर त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी ठाकरे गटाकडून आणि भाजपकडून मोठं शक्तिप्रदर्शन करण्यात आले.

शिवसेनेच्या ठाकरे गटाकडूव ऋतुजा लटकेंचा उमेदवारी अर्ज दाखल
Kedar : लोकशाहीचे चारही स्तंभ अधिकाराचा वापर करताना कर्तव्यांचे पालन करतात का?

अंधेरी पोटनिवडणुकीतील ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांचा राजीनामा मंजूर होत नव्हता. त्यामुळे लटके यांना उमेदवारी अर्ज भरण्यात अडचणी येत होत्या. याविरोधात लटके यांनी हायकोर्टात धाव घेतली होती. याप्रकरणी न्यायमुर्ती नितीन जामदार यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली. ऋतुजा लटके यांच्यातर्फे अ‌ॅड.विश्वजित सावंत तर, मुंबई पालिकेतर्फे अ‌ॅड. अनिल साखरे यांनी बाजू मांडली.

महानगरपालिकेला आपल्या सेवेचा राजीनामा त्वरीत मंजूर करण्याचे आदेश द्यावेत, अशी त्यांनी मागणी केली होती. आता मात्र या प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान न्यायालयाने मुंबई पालिकेला खडसावले. पालिकेकडे विशेषाधिकार आहेत, असे असतानाही अशी प्रकरणं न्यायालयात येता कामा नये, असे पालिकेला बजावले. तसेच, "उद्या (शनिवारी) सकाळी अकरा वाजेपर्यंत लटके यांचा राजीनामा मंजूर करा," असा आदेश उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला दिला.

न्यायालयीन लढाई लढल्यानंतर अखेर महापालिकेने त्यांचा राजीनामा मंजूर केला राजीनामा मंजूरीचे पत्र हाती येताच ऋतुजा लटके शिवसेनेच्या बाजूने आपला उमेदवारी अर्ज दाखल करतील. तर भाजपच्या बाजून मुरजी पटेल त्यांचा उमेदवारी अर्ज भरतील. तर भाजप कडूनही या जागेसाठी मुरजी पटेल यांचे नाव समोर आले होते. पण आता शिवसेनेच्या ऋतुजा लटके आणि भाजपचे मुरजी पटेल हा सामना पाहायला मिळणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com