देशातील सर्वांत श्रीमंत बिल्डर शिंदे मंत्रिमंडळात; BMC निवडणुकीपूर्वी फडणवीसांची खेळी

MangalPrabhat Lodha | Eknath Shinde | Shivsena : देशातील नामवंत श्रीमंत बिल्डरांमध्ये लोढा यांचे नाव
MangalPrabhat Lodha
MangalPrabhat LodhaSarkarnama

मुंबई : शिंदे सरकारचा बहुप्रतिक्षित मंत्रिमंडळ विस्तार आज पार पडला. यावेळी भाजप (BJP) आणि शिंदे गटाकडून (Eknath Shinde) ९-९ असे एकूण १८ मंत्री शपथबद्ध झाले. या मंत्रिमंडळात भाजपकडून राधाकृष्ण विखे पाटील, सुधीर मुनगंटीवार, चंद्रकांत पाटील, विजयकुमार गावित, गिरीष महाजन, सुरेश खाडे, अतुल सावे, मंगल प्रभात लोढा यांना संधी देण्यात आली आहे. तर शिंदे गटाकडून गुलाबराव पाटील, दादा भुसे, उदय सामंत, संदिपन भुमरे, संजय राठोड, शंभुराजे देसाई, दिपक केसरकर, तानाजी सावंत, अब्दुल सत्तार यांची वर्णी लागली आहे. (Maharashtra Cabinet Expansion news)

दरम्यान, आजच्या मंत्रिमंडळाची अनेक वैशिष्ट्य सांगण्यात येत आहेत. यात देशातील सर्वात श्रीमंत बांधकाम व्यावसायिक मंगलप्रभात लोढा यांनाही मंत्रिमंडळात मानाचं स्थान देण्यात आले आहे. आगामी मुंबई महापालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून त्यांना संधी दिली असल्याची चर्चा आहे. त्यामुळे आता मुंबईमधील शिवसेनेचे प्राबल्य कमी करण्यासाठी लोढा यांचा भाजप कसा उपयोग करुन घेणार हे पाहणे गरजेचे ठरणार आहे.

कोण आहेत मंगलप्रभात लोढा?

मंगलप्रभात लोढा हे स्वातंत्र्य सैनिक आणि निवृत्त न्यायाधीश गुमान माल लोढा यांचे सुपूत्र आहेत. लोढा यांनी राजस्थानमध्ये एलएलबीचं शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर काही दिवस वकिलीही केली. परंतु, वडील न्यायाधीश असल्याने त्यांनी वकिली सोडत थेट मुंबईत गाठली. मुंबईत आल्यानंतर लोढा यांनी एका खासगी रिअल इस्टेटमध्ये नोकरी सुरु केली.

जवळपास ४ वर्ष फर्ममध्ये काम केल्यानंतर बिल्डिंगला लागणारे मटेरिअल पुरवण्याचे काम त्यांनी सुरु केले. पुढे १९८२ मध्ये एका मित्राच्या मदतीनं नालासोपारा इथे जमीन खरेदीविक्रीचा व्यवसाय सुरू केला आणि याच व्यवसायात त्यांनी जम बसवला. २०२० मधील माहितीनुसार त्यांच्या परिवाराची एकूण संपत्ती ४४ हजार कोटी रुपयांवर पोहोचली होती.

हळूहळू देशातील नामवंत श्रीमंत बिल्डरांमध्ये लोढा यांचे नाव होत गेले. या दरम्यान त्यांनी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे कार्यकर्ते म्हणून त्यांनी काम सुरू करत ते भाजपमध्ये आले आणि आमदार, मंत्री झाले. मलबार हिल या मतदारसंघातून लोढा भाजपचे आमदार आहेत. १९९५ पासून सलग ते या मतदारसंघातून निवडून येत आहेत. १९९५ मध्ये तत्कालीन नगरविकास मंत्री बी.एस देसाई यांचा त्यांनी पराभव केला होता.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com