NCB च्या अहवालात रियाचे ३२ वेळा नाव ; 5 ग्रॅम गांजा 10 हजारांना विकत घेतला होता..

सुशांतच (Sushant Singh Rajput) नव्हे तर तर भाऊ शौविकसाठीही ती ड्रग्ज खरेदी करायची, असे आरोपपत्रात म्हटलं आहे.
Sushant Singh Rajput, riya chakraborty
Sushant Singh Rajput, riya chakrabortysarkarnama

मुंबई : अभिनेता सुशांत सिंह (Sushant Singh Rajput) मृत्यू प्रकरणात सुशांतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीच्या (riya chakraborty) आणि अन्य आरोपींच्या विरोधात केंद्रीय अंमली पदार्थ नियंत्रण विभागाने (एनसीबी) आरोपपत्राचा मसुदा सादर केला आहे. या आरोपपत्रातून अनेक धक्कादायक माहिती समोर येत आहे. (Sushant Singh Rajput news update)

मंगळवारी एनसीबीने 6272 पानांचे डिजिटल पुरावे, 2226 पानांचे बँकेची कागदपत्रे आणि मोबाईल नंबरची सीडीही न्यायालयात सादर केली आहे. पुरावा म्हणून 2960 कागदपत्रे सादर केली आहेत. यात रिया व अन्य दोन आरोपींवर एनसीबीनं गंभीर आरोप केले आहेत. रियासह अन्य आरोपींवर आरोपनिश्चितीची प्रक्रिया लवकरच होणार आहेत.

रिया चक्रवर्तीने तिच्या घरी ड्रग्जची डिलिव्हरी घेतली होती. रियाने आपल्या घरी ड्रग्जचा साठा केला होता. ड्रग्जसाठी पैसेदेखील दिले होते. यावरून रिया अमली पदार्थांच्या व्यवहारात सक्रिय होती,तिचा भाऊ शौविक याने या कामात पूर्ण मदत केली होती हे सिद्ध होते, असे आरोप एनसीबीनं केला आहे.

Sushant Singh Rajput, riya chakraborty
रिया चक्रवर्तीनेच गांजा खरेदी करुन सुशांतला दिला ; एनसीबीचा आरोप

रिया किराणासोबत गांज्याचेही बजेट बनवायची, 25 ग्रॅमची पॅकेट्स घ्यायची, सुशांतच नव्हे तर तर भाऊ शौविकसाठीही ती ड्रग्ज खरेदी करायची, असे आरोपपत्रात म्हटलं आहे.

Sushant Singh Rajput, riya chakraborty
Disale Guruji: ग्लोबल टीचर डिसले गुरुजींना दणका : 34 महिन्यांचा पगार होणार वसूल

एनसीबीने सादर केलेल्या 49 पानी अहवालात रियाच्या नावाचा 32 वेळा उल्लेख आहे.सुशांतच्या सांगण्यावरून 17 मार्च रोजी रियाचे एटीएम कार्ड वापरून तिचा मॅनेजर सॅम्युअल मिरांडा याने झैद विलात्रा नावाच्या व्यक्तीकडून 10 हजार रुपयांना 5 ग्रॅम गांजा विकत घेतला होता, असे आरोपपत्रात म्हटलं आहे.

रिया चक्रवर्तीचे ड्रग्ज प्रकरण हे सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूशी जोडलेले आहे, असा दावाही एनसीबीने केला आहे. त्यामुळे या प्रकरणात रिया चक्रवर्तीसमोरील अडचणी वाढण्याची शक्यता आहे. विशेष एनडीपीएस न्यायालयात न्यायमूर्ती व्ही. जी. रघुवंशी यांनी या प्रकरणाच्या सुनावणीसाठी 27 जुलैची तारीख निश्चित केली आहे.

NCB च्या अहवालात म्हटलं आहे..

  1. ड्रग्जच्या फायनान्स ते मॅनेजमेंटपर्यंतची सर्व कामे रिया करत असे.

  2. रियाने 16 मार्च रोजी ड्रग्ज खरेदी करण्यापूर्वी शौविक आणि इतरांसोबत बैठक घेतली होती.

  3. ड्रग्ज खरेदी करण्यापूर्वी प्रत्येकाने किंमत, पेमेंट आणि वितरण पद्धती यावर चर्चा केली होती.

  4. किराणा सामान आणि गांजा आणण्यासाठी रियाने दीपेश सावंतला सात हजार रुपये दिल्याचेही याच मुद्द्यात नमूद केले आहे.

  5. ड्रग्स वापरण्यासाठी रियाने सुशांतला तिचे घर दिले होते

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com