रिसॉर्ट पॉलिटीक्स : मुंबईत आमदारांसाठी 5 स्टार सुविधा; चार दिवसात कोट्यावधींचा चुराडा

Resort Politics | Congress | Shivsena | NCP : सर्वांत कमी खर्च भाजपचा?
रिसॉर्ट पॉलिटीक्स : मुंबईत आमदारांसाठी 5 स्टार सुविधा; चार दिवसात कोट्यावधींचा चुराडा
Mahavikas Aghadisarkarnama

मुंबई : राज्यसभा निवडणुकीची रणधुमाळी अंतिम टप्प्यात आली आहे. उद्या (शुक्रवारी) मतदान होवून संध्याकाळ पर्यंत मतमोजणी आणि निकाल जाहीर होणार आहे. मात्र त्यापूर्वी क्रॉस व्होटिंगच्या भीतीने प्रत्येक आमदाराला सुरक्षित ठेवण्यासाठी सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे. मागील ४ दिवसांपासून शिवसेना (Shivsena), राष्ट्रवादी (NCP), काँग्रेस (Congress), भाजप (BJP) अशा सर्वच पक्षांच्या आमदारांना 5 स्टार सुविधा देण्यात येत आहे. त्यामुळे दररोज लाखो रुपयांचा चुराडा होत आहे.

शिवसेनेचा खर्च किती?

शिवसेनेने आपल्या आमदारांची व्यवस्था ट्रायडंट हॉटेलमध्ये केली आहे. त्याआधी शिवसेनेने मढमधील हॉटेल रिट्रीट येथे केली होती. पण रोजच्या बैठकांच्या दृष्टीने ते अंतर बरंच लांब पडत असल्याने आमदारांनी नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर पुन्हा ट्रायडंटमध्ये व्यवस्था करण्यात आली. या हॉटेलमध्ये शिवसेनेने सध्या ७० रुम बुक केल्या आहेत. यात पक्षाचे आणि अपक्ष अशा आमदारांना ठेवण्यात आले आहे.

दरम्यान ट्रायडंट हॉटेलमध्ये एका रुमचं एका दिवसाचं भाडं सुमारे १६ हजार ७०० रुपये आहे. म्हणजे एक दिवसाचा खर्च ११ लाख ५० हजारांच्या घरात जातो. पक्षाने चार दिवसांसाठी या हॉटेलमध्ये रुम बुक केल्या आहेत. म्हणजेच ४ दिवसांचा रुम आणि जेवणाचा खर्च जवळपास ८० लाखांच्या घरात जातो.

काँग्रेस-राष्ट्रवादीचा खर्च ७० लाखांच्या घरात.

कॉंग्रेसने त्यांचे आमदार पवई येथील west in hotel मध्ये ठेवले आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस त्यांच्या आमदारांना रेनसान्स हॉटेलमध्ये ठेवलं आहे. या हॉटेलच्या एका रुमचं एका दिवसाचं भाडं १६ हजार आहे. दोन्ही पक्षांनी दोन हॉटेलमधील मिळून जवळपास १२० रुम बुक केल्या आहेत. त्यामुळे तीन दिवसांचा राहण्याचा आणि जेवणाचा खर्च अंदाजे ७० लाख रुपये आहे.

भाजपचा खर्च ५० लाखांच्या घरात.

विरोधी पक्ष भाजपने आमदारांच्या मुक्कामची सोय ताज प्रेसिडेंट हॉटेलमध्ये केली आहे. इथे राहण्यासाठी एका रुमचं एका दिवसाचं भाडं १४ हजार रुपयांच्या जवळपास आहे. भाजपने दोन दिवसांसाठी हॉटेलमधील १२० रुम बुक केले आहेत. त्यामुळे जेवण आणि राहणे मिळून ५० लाखांच्या जवळपास दोन दिवसांचा खर्च जाणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in