राजकीय भयातून कृषी कायदे रद्द; संजय राऊतांची टीका

पण सरकारच्या (Government) आडमुठेपणाच्या भुमिकेमुळे शेकडो शेतकऱ्यांचे (farmers) जीव गेले.
राजकीय भयातून कृषी कायदे रद्द; संजय राऊतांची टीका
Sanjay Raut

नवी दिल्ली : केंद्रसरकारने राजकीय भयातून तीन कृषी कायदे (agricultural act) रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. अशी टीका शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केली आहे. गेल्या वर्षभरापासून दिल्ली, पंजाबच्या सीमेवर शेतकरी आंदोलन करत आहेत. पण आज अखेर केंद्राला शेतकऱ्यांपुढे झुकावं लागलं. केंद्राला तीन कृषी कायदे मागे ध्यावे लागले. पंजाब, उत्तरप्रदेशातील आगामी निवडणूका डोळ्यासमोर ठेवून केंद्रसरकारने हा निर्णय घेतला असल्याचे संजय राऊतांनी म्हटले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (PM Narendra Modi) देशाला संबोधित करताना आज तीन केंद्रीय कृषी कायदे रद्द करण्याचा निर्णय घेतला. यावर संजय राऊत यांनी केंद्र सरकारच्या या निर्णयाचे स्वागत केले. पण टिकाही केली, देर आये दुरुस्त आये, असं म्हणत त्यांनी केंद्र सरकारच्या या निर्णयाचे स्वागत केले. केंद्रसरकारने कृषी कायदे केले पण देशातील सर्व जनतेचा शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा होता. गेल्या वर्षभरात सत्ताधारी पक्षाला लोकांनी शेतकऱ्यांना दहशतवादी, आतंकवादी, खलिस्तानी म्हणून हिणवलं, शेतकऱ्यांच्या विरोधात आंदोलने निघाली, शेतकऱ्यांवर इतके अत्याचार झआले, पण सरकार उघड्या डोळ्यानी पाहत होतं. असंही संजय राऊत यावेळी म्हणाले.

Sanjay Raut
कृषी कायदे रद्द करताना मोदींनी केली नव्या समितीची घोषणा

गेल्या वर्षभरात शेतकऱ्यांनी इतकी आंदोलने केली. पण सरकारच्या आडमुठेपणाच्या भुमिकेमुळे शेकडो शेतकऱ्यांचे जीव गेले. इतकी आंदोलने झाली पण तरीही केंद्रसरकारने याकडे दुर्लक्ष केलं. लखीमपुरखीरीमध्ये शेतकऱ्यांना चिरडून मारलं, त्यांच्याविरोधात दबावाच राजकरण केलं. खलिस्तानी, पाकिस्तानी, दहशतवादी म्हणुन आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न झाला. पण शेतकरी मागे हटले नाहीत.

गेल्या दीड वर्षांपासून शेतकरी दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करत होते. आतापर्यंत या लढ्यात शेकडो शेतकऱ्यांनी बलिदान दिले, काही शेतकरी हार्ट अॅटकने गेले, पण हा निर्णय एक वर्षापुर्वीच झाला असता तर शेकडो शेतकऱ्यांचे जीव वाचले असते, आता पंजाब आणि उत्तरप्रदेशच्या निवडणूका जवळ येत आहेत, या निवडणूकांमध्ये पराभव होण्याची केंद्रसरकारला भिती आहे, म्हणूनच केंद्राने हे निर्णय मागे घेतला असंही त्यांनी स्पष्ट केलं.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in