मुंडेंना ब्लॅकमेलिंग करणाऱ्या रेणू शर्माचा पोलीस कोठडीतील मुक्काम वाढला

रेणू शर्मा हीने मागील वर्षी जानेवारी महिन्यात धनंजय मुंडे यांच्या विरोधात बलात्कार केल्याचा आरोप केला होता.
Renu Sharma, Dhananjay Munde
Renu Sharma, Dhananjay Mundesarkarnama

मुंबई : राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्याविरोधात बलाकाराची तक्रार करण्याची धमकी देऊन ५ कोटींची खंडणी मागणाऱ्या रेणू शर्मा (Renu Sharma)हीचा पोलिस कोठडीतील मुक्काम वाढला आहे. आज तिची पोलिस कोठडी संपल्याने तिला न्यायालयात हजर करण्यात आले होते. न्यायालयाने तिला सोमवारपर्यंत पोलीस कोठडी वाढवली आहे.

मुंबईच्या गुन्हे शाखेने तिला इंदूर येथून अटक केली होती. धनंजय मुंडे यांनी रेणू शर्माच्या विरोधात मुंबईच्या मलबार हिल पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. रेणू शर्मा हीने मागील वर्षी जानेवारी महिन्यात धनंजय मुंडे यांच्या विरोधात बलात्कार केल्याचा आरोप केला होता. त्यानंतर काही दिवसातच तिने ही तक्रार मागे घेतली होती.तेव्हापासून रेणू शर्मा ही परदेशातील नंबर वापरून मेसेज, व्हाट्सएप तसेच फोन करून मुंडेंकडून पैश्यांची मागणी करत होती. यासंदर्भातील सर्व पुरावे धनंजय मुंडे यांनी पोलिसाना दिले आहे.

Renu Sharma, Dhananjay Munde
आमचा नाद करु नका ; शिवसेनेची पुन्हा डरकाळी, राणांची नौटंकी संपली !

''पिछले साल एक कागज सोशल मीडिया पर डाला तो तुम्हारा मंत्रीपद जानेकीं नौबत आ गई थी। अब अगर मेरी मांग पूरी नहीं की तो बदनाम कर दुँगी। अगर मंत्री पद बचाना चाहते हो, तो दस करोड कौनसी बडी बात है?''अशा आशयाचे मेसेज तिनं मुंडेंना पाठविला होता. याद्वारे 5 कोटी रुपये कॅश व 5 कोटी रुपयांचे दुकान विकत घेऊन देण्याची मागणी रेणू शर्माने केली असल्याचे धनंजय मुंडे यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे.

Renu Sharma, Dhananjay Munde
वाजवत बसा घंटा ! शिवसेनेचे हिंदुत्व गदा धारी ; राऊतांचा हल्लाबोल

रेणू शर्मा ही मूळ इंदौर( मध्यप्रदेश) येथील असून करुणा शर्मा यांची बहीण आहे, मुंडे यांच्या तक्रारीनंतर मुंबई क्राईम ब्रँच व इंदौर पोलिसांनी संयुक्त कारवाई करत तिला अटक करून आधी (ता.२०) इंदौर कोर्टात हजर केले होते. इंदोर कोर्टाने तिला रिमांड दिला आणि त्यानंतर गुरुवारी (ता.21) तिला पुढील चौकशीसाठी मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतले होते. त्यावेळी न्यायालयाने तिला आजपर्यंत (ता.२३) पोलीस कोठडी सुनावली होती. रेणु शर्मावर इतर अनेक व्यक्तींनीही संदर्भातल्या तक्रारी यापुर्वी अनेकदा विविध पोलीस ठाण्यात दाखल केल्या आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com