MNS News : आदेश बांदेकरांची हाकालपट्टी करा; मनसेची मुख्यमंत्री शिंदेंकडे मागणी

Aadesh Bandekar : ठाकरे गट आणि मनसे यांच्यामध्येही राजकारण तापणार?
Aadesh Bandekar and Yashwant Killedar
Aadesh Bandekar and Yashwant Killedar Sarkarnama

Aadesh Bandekar News : प्रसिद्ध अभिनेते आणि ठाकरे गटाचे नेते आदेश बांदेकर यांची सिद्धिविनायक न्यास मंदिर अध्यक्षपदावरून हकालपट्टी करण्यात यावी, अशी मागणी मनसे उपाध्यक्ष यशवंत किल्लेदार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.

गेल्या काही दिवसांपासून आदेश बांदेकर यांच्यावर यशवंत किल्लेदार हे गंभीर आरोप करत आहेत. तर दुसरीकडे सिद्धिविनायक मंदिराबाबत करण्यात आलेले आरोप खोटे आहेत, असं म्हणत बांदेकर यांनी त्यांच्यावर करण्यात आलेले आरोप फेटाळले आहेत.

Aadesh Bandekar and Yashwant Killedar
History of Shivsena Bhavan : चर्चेच्या केंद्रस्थानी असलेलं शिवसेना भवन कसं आहे? पाहा फोटो...

त्यानंतर आता पुन्हा एकदा यशवंत किल्लेदार यांनी आदेश बांदेकर यांची पदावरुन हकालपट्टी करण्याची मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे. त्यामुळे ठाकरे गट आणि मनसे यांच्यामध्ये देखील राजकारण तापण्याची शक्यता आहे.

Aadesh Bandekar and Yashwant Killedar
Politics : बिहारच्या राजकारणात मोठी उलथापालथ; कुशवाहांनी जेडीयूचा राजीनामा देत केली नव्या पक्षाची घोषणा

काय आहे यशवंत किल्लेदार यांचे ट्विट?

''तुम्ही उत्तम काम करत आहात म्हणून शिवसेना तुमच्याकडे आली. माझी आपल्याला विनंती आहे, तुम्ही सर्वप्रथम सिद्धिविनायक न्यास मंदिर अध्यक्ष आदेश बांदेकर यांची या पदावरुन हकालपट्टी करा. उद्धव ठाकरे यांच्यामुळे बांदेकर न्यास मंदिर अध्यक्ष पदाच्या खुर्चीला चिटकून आहे'', असं ट्विट किल्लेदार यांनी केलं असून एकनाथ शिंदे यांच्याकडे मागणी केली आहे.

दरम्यान, एकनाथ शिंदे यांना शिवसेना मिळाल्यानंतर आता मनसेने आदेश बांदेकरांची हकालपट्टीची मागणी केली आहे. त्यामुळे यावर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) काय निर्णय घेतात? हे पाहणं महत्वाचं असणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com