सोशल मीडियावर एकमेकांची उणीधुणी काढली तर याद राखा; राज ठाकरेंचा इशारा

Raj Thackeray : पेशव्यांच्या हाती संपूर्ण सत्ता होती, पण त्यांनी कधी स्वत:ला छत्रपती म्हणवून घेतले नाही.
MNS |Raj Thackeray Latest News
MNS |Raj Thackeray Latest News Sarkarnama

मुंबई : माझं बोलणं, विचार, भूमिका लोकापर्यंत पोहोचवा. मात्र जर कुणी मनसेच्या (MNS) पदाधिकाऱ्याने अथवा कार्यकर्त्याने पक्षांतर्गत एकमेकांविरोधात सोशल मीडियावर एकजरी पोस्ट केली आणि एकमेकांची उणीधुणी काढली तर याद राखा..मी एक क्षणही त्याला पक्षात ठेवणार नाही,असा थेट इशाराच राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मनसे कार्यकर्त्यांना दिला. राज ठाकरे यांनी शस्त्रक्रियेनंतर प्रथमच आज (ता.२३ ऑगस्ट) मुंबईतील रवींद्र नाट्यमंदिर येथे झालेल्या मेळाव्यात मनसे पदाधिकाऱ्यांना संबोधित केले. यावेळी त्यांनी अनेक विषयावर भाष्य केले. (MNS, Raj Thackeray Latest News)

MNS |Raj Thackeray Latest News
Ajit Pawar : तुम्ही भाषण देत होते, तेव्हा काही फूट अंतरावर शेतकऱ्याने पेटवून घेतले !

राज ठाकरे यांनी यावेळी बोलतांना अनेक विषयावर आपले मत मांडले. ते म्हणाले की, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका दिवाळीनंतर किंवा कदाचित जानेवारीपर्यंतही लागू शकतात. महपालिका, जिल्हा परिषद, नगरपालिकेच्या निवडणुका पुढे ढकलण्यावरूनही राज्यात राजकारण सुरु असून हे कोरोनापासून सुरु आहे. त्यामुळे निवडणुका कधीही लागतील. महाराष्ट्रात असे कधीच घडले नव्हते असे आता घडत आहे. मात्र सध्या राज्यात जे सुरु हे सर्व ते सर्व विचित्र असून राज्याची अवस्था उत्तर भारताच्या राजकारणासारखी झाली आहे, अशी टीकाही त्यांनी केली.

ते म्हणाले, महाराष्ट्राने कवी, लेखक दिले. शिवाय महाराष्ट्राला आतापर्यंत आठ भारतरत्न मिळाली आहेत. यापैकी चार जण हे एकट्या दापोलीतील आहे. तिकडे जाऊन विचारा त्यांचे काही आहे का? फक्त पुतळे उभे करून काही होत नाही. मात्र त्याचे आम्हाला काही पडलेले नाही. आमचे महापुरुष आम्ही जातीत वाटून घेतले आहेत. प्रत्येक जण एकमेकांचे वाभाडे काढत आहे. तुम्हाला वेगळे ठेवण्यासाठी हे सुरु आहे, असे मतही राज यांनी व्यक्त केले.

MNS |Raj Thackeray Latest News
सोमवारी उशिरापर्यंत यादी नसणारे महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचे प्रकरण असे आले सुनावणीला

राज ठाकरे पुढे म्हणाले की, राजकारणात येण्यासाठी मी राज्यातील जनतेला पत्र लिहिणार आहे. पेशव्यांच्या हाती संपूर्ण सत्ता होती, पण त्यांनी कधी स्वत:ला छत्रपती म्हणवून घेतले नाही. आम्ही नोकर, छत्रपती तेच आहेत. आम्ही फक्त विचार पोहोचवतोय,असे सांगतांना राज यांनी मी बाळासाहेबांचे विचार पोहोचवत असल्याचे सांगितले. यासाठी माझ्याकडे निशानी असली काय आणि नसली काय, पक्ष असला काय नसला काय, मी नशीबवान आहे, असा टोलाही त्यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला.

MNS |Raj Thackeray Latest News
नुपूर शर्मा योग्यच बोलल्या, पण त्यांना वेगळा न्याय का? राज ठाकरेंचा सवाल

दरम्यान, आगामी निवडणुकीबाबत बोलतांना ते म्हणाले की, या निवडणुका आपल्याला अत्यंत हिंमतीने आणि अत्यंत ताकदीने लढवायच्या आहेत. यासाठी अॅडजस्टमेंट करू नका, लाचार होऊ नका. तुमची किंमत शून्य करून घेऊ नका. आपल्याकडून जो उभा राहील, त्याला ताकद द्या. मी शक्य होईल तेवढ्या सभा करेल. याबरोबरच गणपतीनंतर मी दौरे करेल, सभा घेईल, असेही त्यांनी जाहीर केले. तसेच मनसेच्या पदाधिकाऱ्याने अथवा कार्यकर्त्याने पक्षांतर्गत एकमेकांविरोधात सोशल मीडियावर एकजरी पोस्ट केली आणि एकमेकांची उणीधुणी काढली तर याद राखा, मी त्याला एक क्षणही त्याला पक्षात ठेवणार नाही. मी तुमचे खूप चोचले पुरवले. आता खूप झालं, मी ते यापुढे चालू देणार नाही आणि अस होत असेल तर ते माझ्यापर्यंत पोहचल पाहिजे, असा दमच राज ठाकरे यांनी भरला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com