मुंबई पोलिसांची ताकद वाढली; वाळूतूनही चालणारी अत्याधुनिक 'एटीव्ही' वाहने ताफ्यात

मुंबईतील किनारे व पर्यटकांच्या सुरक्षेसाठी अत्याधुनिक 'ऑल टेरेन व्हेईकल्स' (एटीव्ही) वाहने मुंबई पोलीस दलाला मिळाली आहेत.
reliance foundation donates ten atv vehicles to mumbai police
reliance foundation donates ten atv vehicles to mumbai police

मुंबई : मुंबईतील (Mumbai) किनारे व पर्यटकांच्या सुरक्षेसाठी अत्याधुनिक 'ऑल टेरेन व्हेईकल्स' (ATV) वाहने मुंबई पोलीस (Mumbai Police) दलाला मिळाली आहेत. ही वाहने रस्त्यांसह वाळूतही चालू शकतात आणि त्यामुळे पोलिसांना तत्काळ घटनास्थळी पोचता येईल. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्या उपस्थितीत आज ही एटीव्ही वाहने पोलीस दलाला देण्यात आली. 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झेंडा दाखवून ही दहा एटीव्ही वाहने मार्गस्थ झाली. ही वाहने चौपाटी आणि पर्यटकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरतील, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी या वेळी व्यक्त केला. रिलायन्स फाऊंडेशनच्या वतीने ही वाहने पोलीस दलाला देण्यात आली आहेत. ही वाहने रस्त्यांसह वाळूतही चालतात. त्यामुळे पोलिसांना तातडीने घटनास्थळी दाखल होणे शक्य होईल. 

मुंबई पोलिस दलाच्या ताफ्यात १० एटीव्ही वाहने दाखल झाली आहेत. ही सर्वसमावेशक अशी वाहने आहेत. ती जमीन, रेती, दलदलीचा भाग, वालुकामय अशा सर्व ठिकाणी चालतात. त्यामुळे चौपाटी परिसरात त्यांचा वापर करता येऊ शकतो. या वाहनांची क्षमता ५७० सीसी आहे. ही वाहने वेगवान असून, बंदोबस्तावरील चार पोलीस कर्मचारी या वाहनातून गस्त घालू शकतात. आपत्कालीन प्रसंगी वाहनातील दोरखंड, तरंगते हुक्स या गोष्टींचाही वापर करता येतो. गिरगावसह इतर चौपाट्यांवरही पुढील काळात ही वाहने तैनात करण्यात येणार आहेत. 

गिरगाव चौपाटी येथे झालेल्या या कार्यक्रमास पालकमंत्री आदित्य ठाकरे, अस्लम शेख, महापौर किशोरी पेडणेकर, खासदार अरविंद सावंत, आमदार मंगलप्रभात लोढा, गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, पोलीस महासंचालक संजीव पांडे, मुंबईचे पोलिस आयुक्त हेमंत नगराळे, सहपोलिस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील , रिलायन्स फाऊंडेशनच्या शिरीन कोतवाल आदी उपस्थित होते. मुंबईचे पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. या वाहनांची माहिती त्यांनी उपस्थितांना दिली. सहपोलिस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांनी आभार मानले.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com