Budget Session : विधानसभा अध्यक्षांविरोधातला अविश्वास प्रस्ताव फेटाळला : महाविकास आघाडी तोंडघशी !

MVA News : एका वर्षाच्या कालावधीत असा प्र्स्ताव आणता येणार नाही.
Ajit Pawar : Rahul Narwekar
Ajit Pawar : Rahul NarwekarSarkarnama

Ajit Pawar News : राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून सुरूवात झाली आहे. शिंदे -फडणवीस सरकार स्थापन झाल्यावर हे पहिलेच अर्थसंकल्पीय अधिवेशन पार पडत आहे. दरम्यान मागील हिवाळी अधिवेशनात विधानसभा अध्यक्ष यांच्याविरोधात आणला गेलेला अविश्वास प्रस्ताव, आज अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी फेटाळून लावला आहे.

विरोधी पक्षांनी हिवाळी अधिवेशनामध्ये विधानसभा अध्यक्षांविरोधात आणलेला अविश्वास प्रस्ताव आज पटलावर आल्यानंतर अध्यक्षांनीच तो फेटाळून लावला आहे. हिवाळी अधिवेशनात आणला गेलेला हा प्रस्ताव एका वर्षाच्या कालावधीच्या आत आल्याचे तांत्रिक कारण देवून हा प्रस्ताव नाकारण्यात आला आहे. हिवाळी अधिवेशनात आणला गेलेला विषय, आशयाचा प्रश्न एक वर्षाच्या आत मांडता येणार नाही, या नियमावर बोट ठेवत हा प्रस्ताव फेटाळून लावला आहे.

Ajit Pawar : Rahul Narwekar
Dhananjay Munde : "समाज माझ्यावर थुंकत होता, 'धन्या'शिवाय बोलत नव्हता.." ; धनंजय मुंडे भावूक!

अशा आशयाचा प्रस्ताव ४ जुलै २०२२ रोजी सभागृहात मांडण्यात आलं होतं. त्या प्रस्तावाचा आशय आणि हिवाळी अधिवेशनात सादर केलेल्या प्रस्तावाचा आशय समान आहे. या तांत्रिक कारणास्तव अविश्वास प्रस्ताव अमान्य करून तो फेटाळण्यात आला.

राहुल नार्वेकर यांची विधानसभा अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर काँग्रेस आमदार संग्राम थोपटे, काँग्रेस आमदार संजय जगताप, ठाकरे गटाचे आमदार कैलास पाटील यांनी अध्यक्ष निवडीच्या प्रक्रियेवर आक्षेप घेत नोटीस दिली होती. याचाच आधार महाविकास आघाडीकडून अध्यक्षांविरोधात अविश्वास प्रस्ताव दाखल केला गेला होता. मात्र अध्यक्षांनी हा प्रस्ताव नाकारत, फेटाळून लावला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Sarkarnama
www.sarkarnama.in