राहुल गांधींंच्या 'त्या' वक्तव्याने प्रादेशिक पक्ष नाराज

rahul gandhi| महाराष्ट्रातही शिवसेनेत चलबिचल सुरु झाली आहे.
rahul gandhi|
rahul gandhi|

नवी दिल्ली : खासदार राहुल गांधी यांच्यावर मित्रपक्ष शिवसेना, द्रमुक, झारखंड मुक्ती मोर्चा (झामुम), राजद आदी प्रादेशिक पक्ष नाराज असल्याची माहिती समोर आली आहे. प्रादेशिक पक्षांकडे कोणतीही ठोस विचारसरणी आणि व्यापक भूमिका नाही. त्यामुळे भाजपविरोधात फक्त काँग्रेसच स्वबळावर लढू शकते, असे वक्तव्य राजस्थानातील उदयपूर येथे झालेल्या नवसंकल्प शिबीरात राहुल गांधी यांनी केले. ज्यामुळे प्रादेशिक पक्ष नाराज असल्याचे बोलले जात आहे.

महाराष्ट्रात शिवसेनेसोबत महाविकास आघाडी सरकारमध्ये काँग्रेसही सहभागी आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्ष राज्यात एकत्रितपणेच निवडणुका लढतील, असे नेहमी सांगतात, पण राहुल गांधी यांच्या वक्तव्याने मात्र राज्यातील इतर पक्षांमधील चलबिचल वाढली आहे. राहुल गांधी यांच्या वक्तव्यावर अद्याप शिवसेनेच्या एकाही नेत्याने प्रतिक्रीया दिलेली नाही.

rahul gandhi|
आता लखनौचे नावही बदलणार? सीएम योगींच्या ट्विटनंतर चर्चांना उधाण

राष्ट्रीय जनता दलाने मात्र राहुल गांधी यांच्या विधानांविरोधात नाराजी व्यक्त केली आहे. २० वर्षांपूर्वी लालुप्रसाद यादव यांनी काँग्रेसबरोबर युती करत भाजपविरोधात सातत्याने लढा दिला. तर, झारखंडमध्येही काँग्रेसने झारखंड मुक्ती मोर्चाशी आघाडी केली. आज हे दोन्ही पक्ष तेथील आघाडी सरकारमध्ये सहभागी आहेत. तर झारखंडमंध्ये भाजपला पराभूत करण्यास कॉंग्रेस अपयशी ठरत होती तेव्हा आमच्या पक्षाने त्यांना पाठिंबा दिला, असे असतानाही प्रादेशिक पक्षांना ठोस विचारसरणीच नाही, असे राहुल गांधी कसे काय म्हणू शकतात? असा सवाल झामुम च्या एका नेत्याने उपस्थित केला आहे.

तर दुसरीकडे केरळमध्येही काही प्रादेशिक पक्षांनी काँग्रेसने युती करून युनायटेड डेमोक्रॅटिक फ्रंटची स्थापना केली. या पक्षांनीही राहुल गांधी यांच्या वक्तव्यावर नाराजी व्यक्त केली आहे. तर तामिळनाडूमध्येही द्रमुक व काँग्रेसची आघाडी असल्याने तिथेही दोन्ही पक्षांनी लोकसभा व विधानसभा निवडणुकाही एकत्र येऊन लढल्या असतानाही राहुल गांधी यांच्या या वक्तव्यावर नाराज आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com