Refinery Project : 'वेदांता' नंतर 'हा' प्रकल्पही महाराष्ट्राबाहेर जाणार ? ; कंपनीकडून अल्टिमेटम ?

Refinery Project : ही कंपनी तीन वर्षापासून रिफायनरी प्रकल्पाच्या ग्रीन सिग्नलसाठी प्रतिक्षेत आहे.
Nanar Refinery Project Supporters to take convention on Monday
Nanar Refinery Project Supporters to take convention on Monday

रत्नागिरी : "वेदांता" (vedant project) प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरात गेला आहे, यावरुन राजकारण पेटल असताना महाराष्ट्रातील आणखी एक प्रकल्प महाराष्ट्राबाहेर जाणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. (Ratnagiri Latest Marathi News)

वेदांता-फॉक्सकॉन कंपनीने (Refinery Project) आपला प्रकल्प गुजरातमध्ये हलवला आहे. यावरुन शिंदे सरकारवर विरोधकांकडून जोरदार टीका होत आहे. त्यातच आता कोकणातील रिफायनरी प्रकल्प (refinery project) देखील महाराष्ट्रातून बाहेर जाणार अशी चिन्ह निर्माण झाली आहेत.

रिफायनरी प्रकल्प करणारी कंपनी आरआरपीसीएल राज्य सरकारला एक महिन्याची मुदत देण्याची तयारीत असल्याचे सूत्रांनी सांगितलं. रत्नागिरीतील रिफायनरी प्रकल्प हा २०१८ पासून रखडलेला आहे. नाणार रिफायनरी प्रकल्प ६० मिलियन मॅट्रिक टनाचा आहे.

राज्य सरकारला (maharashtra government) आरआरपीसीएल कंपनी अल्टिमेटम देण्याच्या तयारीत आहे. ही कंपनी एक महिन्याचा अल्टिमेंटम देण्याच्या तयारीत असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. ही कंपनी तीन वर्षापासून रिफायनरी प्रकल्पाच्या ग्रीन सिग्नलसाठी प्रतिक्षेत आहे.

Nanar Refinery Project Supporters to take convention on Monday
'वेदांता' वरुन अजितदादांनी मुख्यमंत्र्यांनी सुनावले : म्हणाले, 'मोदींना सांगून प्रकल्प महाराष्ट्रात आणा'

आता विलंबामुळे धोपेश्वर रिफायनरी प्रकल्प २० मिलियन मेट्रिक टन क्षमतेचा आहे. रिफायनरीचा पहिला प्रकल्प ३ लाख कोटींचा. विलंबामुळे २ लाख कोटींची अपेक्षित गुंतवणुक यात होणार होती. विलंबामुळे राज्य सरकारने १ लाख कोटींची गुंतवणुक गमावली अशीही चर्चा आहे.

गेल्या तीन वर्षापासून रिफायनरी प्रकल्प उभारण्यासंदर्भात अपेक्षित सहकार्य मिळत नसल्याने प्रकल्प गुंडाळण्याच्या हालचाली वाढल्या आहेत.धोपेश्वर रिफायनरी प्रकल्पाचे सर्वेक्षण पुर्ण होण्यास विरोधकांच्या अडसर तर प्रशासनाची गुळमुळीत भुमिकेमुळे कंपनी नाराज असल्याची चर्चा आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in