नोकरभरतीच्या नुसत्याच घोषणा : निर्णय घ्या, बच्चू कडूंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

Bachchu kadu : वर्ग 2 राजपत्रित व वर्ग 3 आणि 4 ची पदे एमपीएसीच्या माध्यमातून भरण्यात यावी
Bacchu Kadu latest news
Bacchu Kadu latest newsSarkarnama

मुंबई : प्रहार क्रांती संघटनेचे अध्यक्ष आणि आमदार ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू (Bachchu kadu) यांनी राज्यसेवा परीक्षा संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे विविध मागण्या केल्या आहेत. एमपीएससी(MPSC) म्हणजे राज्यसेवा आयोगाच्या कक्षेबाहेरील वर्ग 2 राजपत्रित, वर्ग 3 आणि 4 च्या पदे एमपीएसीच्या माध्यमातून भरण्यात यावी, यासह सबंधित इतर मागण्याही बच्चू कडू यांनी केल्या आहेत. केरळ राज्याच्या धर्तीवर या पदांची भरती करण्यात यावी, अशी मागणी कडू यांनी केली आहे. त्यांची ही मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी मान्य केली आहे. (Bacchu Kadu News)

Bacchu Kadu latest news
Maharashtra pavsali adhiveshan 2022 : सरकार बोलण्यात जास्त.. कामात शुन्य... जयंत पाटलांचा घाणाघात

सन 2018 मध्ये एमपीएससी मुख्यालय बांधकामाबाबत निर्णय झाला असून तांत्रिक अडचणीमुळे रखडलेली प्रक्रिया सुरू करावी व दोन रिक्त असलेल्या पदांची भरती करावी, अशी मागणी कडू यांनी केली आहे.

7200 पोलिस भरतीची घोषणा झाली आहे, त्याची जाहिरात प्रसिद्ध करण्यात यावी. राज्यातील 2019 च्या रखडलेल्या जिल्हा परिषद, एमआयडीसी, पशुसंवर्धन विभाग, सार्वजनिक आरोग्य सेवक इत्यादी पदभरती करण्यात यावी, या मागणीचे पत्र कडू यांनी मुख्यमंत्र्यांना लिहले आहे.

भूमी अभिलेख विभागांतर्गत गट क पदाच्या 1013 पदासाठीच्या परिक्षा घेण्यात यावेत. अत्यावश्यक सेवेतील सहाय्यक आयुक्त, अन्न सुरक्षा अधिकारी गट ब, हे ही पदे भरण्यात यावे.

Bacchu Kadu latest news
Bachchu Kadu : मी नाराज नाही ; मुख्यमंत्र्यांनी मला शब्द दिला आहे !

दिव्यांग व्यक्ती हक्क कायदा 2016 नुसार राज्यातील सर्व स्पर्धा परिक्षांमध्ये दिव्यांगाचा विचार करण्यात यावा. महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा 2019 मधील पात्र 1145 उमेदवारांना चरित्र पडताळणी व वैद्यकीय तपासणीच्या अधीन राहून नेमणूका करण्यात यावे, अशा विविध मागण्या कडू यांनी केल्या आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com