१४९ च्या नोटीसीला पळून जाणारे लोक...: अंधारेंनी मनसेच्या जखमेवर मीठ चोळलं

Sushma Andhare | संदीप देशपांडे आणि संतोष धुरी पोलिसांना चकवा देत गाडीत बसून जाण्यात यशस्वी झाले होते
Sushma Andhare
Sushma Andhare

Sushma Andhare : “मनसे कायमच ड्रामा करणारा पक्ष आहे. गेल्या अडीच वर्षात हनुमान चालीसा आणि भोंग्याचे राजकारण सुरु होतं. मात्र, आता कुठलेच राजकारण मनसेला (MNS) करावे वाटत नाही. कारण, आंदोलन कधी, कोणासाठी आणि किती करायची हे ठरलेलं असते. पण, १४९ च्या नोटीसीला पळून जाणारे लोक, आज शेगावला जाण्यासाठी आंदोलन करत होते,” अशा शब्दात शिवसेना (Shivsena) उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारेंनी मनसे नेते संदिप देशपांडे यांना डिवचलं आहे.

एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्या बोलत होत्या. दरम्यान, युवासेनेते नेते अंकुश कदम यांनी आमच्या नादाला लागु नका आणि या बाईची ( सुषमा अंधारे) हकालपट्टी करा अशी मागणी केली आहे. यालाही अंधारे यांनी सडेतोड उत्तर दिलं आहे. काय बोलले याच्यापेक्षा कोण बोललं, हे जास्त महत्त्वाचे असतं त्यामुळे तुम्ही ज्यांच नाव सांगितंल त्यांची ओळख सोडा त्यांना आम्ही खिजगिणतीतही धरत नाही.

Sushma Andhare
Shraddha Walker च्या वडिलांचे आफताबवर धक्कादायक आरोप....

मशिदींवरील भोंगे उतरवण्यासाठी ४ मे रोजीचा अल्टिमेटम राज ठाकरे यांनी दिला होता. भोंग्यांसंदर्भातील माहिती देण्याकरिता संदीप देशपांडे व संतोष धुरी ‘शिवतीर्था’वर गेले होते. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या घराबाहेर जमलेल्या मनसे कार्यकर्त्यांना मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतले. तेव्हा संदीप देशपांडे आणि संतोष धुरी पोलिसांना चकवा देत गाडीत बसून जाण्यात यशस्वी झाले. पण या झटापटीत एक महिला पोलिस खाली पडून जखमी झाली. याच घटनेची आठवण करुन देत अंधारे यांनी मनसे नेते संदीप देशपांडे यांच्या जखमेवर मीठ चोळलं आहे.

भारत जोडो यात्रेत राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावकरांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर वादाची ठिणगी पडली. त्याबाबतची कागदपत्रेही त्यांनी पत्रकारांना दाखवली. आपण वक्तव्यावर ठाम असल्याचेही ते म्हणाले. त्यांच्या या वक्तव्यावरुन मनसे, शिंदे गट आणि भाजप चांगलीच आक्रमक झाली होती. मनसे थेट राहुल गांधी यांची बुलडाण्यातील शेगाव येथील यात्रेच्या ठिकाणी पोहचणार असल्याचा इशाराही दिला होता. पण राहुल गांधी यांच्या विरोधात आंदोलन करण्यासाठी शेगावला निघालेल्या मनसे नेत्यांना पोलिसांनी चिखलीमध्येच अडवून ताब्यात घेतले. इथेही मनसे नेत्यांनी मोठा राडा केला. मनसेच्या या राड्यावर सुषमा अंधारे यांनी मनसे नेते संदिप देशपांडे यांना सुनावलं आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com