नवा ट्विस्ट! अटक होताच राणा दांपत्यानं मुख्यमंत्री ठाकरेंसह राऊत, परबांना आणलं अडचणीत

राणा दांपत्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसह संजय राऊतांवर गंभीर आरोप
 navneet Rana| Ravi Rana|
navneet Rana| Ravi Rana|Sarkarnama

मुंबई : गेल्या दोन दिवसांपासून मुंबईत सुरू असलेला हनुमान चालिसा पठणाचा हाय व्होल्टेज ड्रामा आज शिगेला पोचला. ‘मातोश्री’समोर हनुमान चालिसा पठणाचा राणा दांपत्यानं इशारा दिला होता. शिवसेनेच्या तक्रारीनंतर त्यांच्यावर खार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर खार पोलिसांनी खासदार नवनीत राणा (Navneet Rana) आणि आमदार रवि राणा (Ravi Rana) यांना अटक केली आहे. या प्रकरणात आता नवा ट्विस्ट आला असून, राणा दांपत्यानेच मुख्यमंत्र्यांसह शिवसेना नेते आणि शिवसैनिकांच्या विरोधात तक्रार केली आहे.

राणा दांपत्याला अटक केल्यानंतर राजकीय वातावरण तापलं आहे या प्रकरणात राणा दांपत्यांना गंभीर आरोप केला आहे. यातच त्यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शिवसेनेचे खासदार संजय राऊत आणि परिवहन मंत्री अनिल परब यांच्यासह अज्ञात शिवसैनिकांविरोधात खार पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. ठाकरे आणि राऊत यांनी शिवसैनिकांना चिथावणी दिली असून आमच्या जिवाला धोका असल्याचं त्यांनी तक्रारीत म्हटलं आहे. शिवसैनिकांनी आंदोलनस्थळी रुग्णवाहिकाही आणली होती, असा दावाही राणा दांपत्यानं तक्रारीत म्हटलं आहे. त्यांच्या या तक्रारीमुळे खळबळ उडाली आहे.

 navneet Rana| Ravi Rana|
पक्षश्रेष्ठींची नाराजी जुन्नरच्या नगराध्यक्षांना भोवली! शिवसेना नेत्यांनी फिरवली पाठ

खार पोलिसांनी राणा दांपत्यास त्यांच्या घरी जाऊन त्यांना पोलीस ठाण्यात येण्याचे आवाहन केले. त्यावेळी राणा दांपत्य आणि पोलिसांमध्ये बाचाबाची झाली. पोलीस राणा दांपत्यास वारंवार विनंती करत होते. त्यावेळी राणा हे पोलिसांना आमचे अटक वॉरंट दाखवा, अशी विचारणा करीत होते. त्यामुळे ते पोलिसांसोबत येण्यास तयार नव्हते. पण पोलिसांच्या शिष्टाईला यश आले आणि त्यांना कडेकोट पोलिस बंदोबस्तात राणा यांना त्यांच्या खार येथील घरातून सुरक्षितपणे बाहेर काढले.

 navneet Rana| Ravi Rana|
झुकेगा नही! 92 वर्षांच्या आजीचा राणा दांपत्याला 'पुष्पा'स्टाईल इशारा अन् लगेचच ठाकरेंचा फोन

खार येथील राणा यांच्या घराबाहेर शिवसैनिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. त्यामुळे वातावरण तणावपूर्ण बनले होते. बाहेर शिवसैनिक हे राणा दांपत्यांनी शिवसेना आणि मुख्यमंत्र्यांची माफी मागावी, अशी मागणी करत होते. त्यामुळे दोन्ही बाजूंकडून तणावाचे वातावरण बनत चालेले होते. अखेर पोलिसांनी सुरक्षितपणे त्यांना घराबाहेर काढून त्यांना खार पोलीस ठाण्यात नेले. नंतर त्यांना अटक करण्यात आली. राणा दांपत्यावर दंगल सदृश्य परिस्थिती निर्माण केल्याप्रकरणी कलम १५३ अ लावण्यात आलं आहे. हा गंभीर आणि अजामीनपात्र गुन्हा आहे. यामुळं उद्या राणा दांत्याला न्यायालयात हजर करण्यात आल्यानंतर त्यांच्याबाबत निर्णय होईल.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com