संजय राऊत 'त्या' विधानावर ठाम; न्यायालयाच्या भूमिकेकडे लक्ष

Sanjay Raut news|न्यायालयात विशिष्ट पक्षाच्या लोकांनाच अटकेपासून संरक्षण मिळतं आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांना जामीन का मिळत नाही? असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला होता.
Sanjay Raut news|
Sanjay Raut news|

मुंबई :''न्यायव्यवस्थेत विशिष्ट विचारसरणीचे लोक आहेत, विशिष्ट पक्षाच्या लोकांनाच अटकेपासून संरक्षण मिळतंय. महाविकास आघाडीच्या नेत्यांना जामीन का मिळत नाही? असा सवाल शिवसेनेते नेते, खासदार संजय राऊत (sanjay raut) यांनी उपस्थित केला होता. न्यायव्यवस्थेवर त्यांनी केलेली टीका त्यांना भोवणार आहे, कारण आता भारतीय बार असोसिएशनने (indian bar association)राऊतांच्या विरोधात अवमान याचिका दाखल केली आहे.

यावर संजय राऊत यांनी प्रतिक्रीया देताना, हा न्यायालयीन दिलासा घोटाळाच आहे. एकाच पक्षाच्या नेत्यांना न्यायालयात दिलासा कसा मिळतो. म्हणून हा न्यायालयीन घोटाळाच आहे आणि मी माझ्या मताशी ठाम असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

Sanjay Raut news|
न्यायालयाचा अवमान संजय राऊतांना भोवणार ? ; जनहित याचिका दाखल

याच वेळी त्यांनी राज्यात मशिदींवरील भोंग्यांविषयी सुरु असलेल्या घडा मोडींवरही निशाणा साधला आहे. सध्या हिंदूत्त्वाच्या नावावर राजकीय भोंग्याचा जो विषय सुरु आहे ते जे ढोंग सुरु आहे ते जास्त वेळ चालणार नाही. मोंदींनी देशात नॅशनल पॉलिसी तयर करावी, दिशानिर्देश द्या, कायदा करा, भोंगा बंदीची सुरुवात बिहार, गुजरातपासून सुरु करा. भोंग्यांच्यावादामुळे हिंदूत्व बदनाम होत आहे. देशात एकच कायदा लागू करा, ही माझ्या पक्षाकडून पंतप्रधान नरेंद्र मोदींना आवाहन आहे. असेही त्यांनी म्हटले आहे.

"'भाजपला आता जाग आली, भाजपची झोप आता उडाली. बाळासाहेब ठाकरे यांची भोंग्याची भुमिका सर्वांना माहिती आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायलायच्या निर्णय आला त्यानंतर महाराष्ट्रात कारवाया सुरूझाल्या. भोंग्यासंदर्भात अक्कल शिकवण्याची गरज नाही. मुस्लिमांचे प्रश्न आम्ही चर्चेतून सोडवले. बाळासाहेब ठाकरेंनी स्वत: मुस्लिम मौलवींशी चर्चा करुन आणि तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी आणि उपमुख्यमंत्री गोपीनाथ मुंडे यांच्याशी बोलून मुस्लिमांच्या रस्स्त्यावरीस नजाम पठणाचा प्रश्न सोडवला.''

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com