सत्तासंघर्षाच्या लढाईत रश्मी ठाकरे यशस्वी होणार का?

CM Uddhav Thackeray| Rashmi Thackeray| आमदारांनी केलेल्या बंडखोरीमुळे पक्ष आणि सरकार दोन्हीही संकटात आले आहेत.
Rashmi Thackeray|
Rashmi Thackeray|

मुंबई : राज्यातील सत्ता संघर्षाचा आज सहावा दिवस आहे. बंडखोर आमदारांमुळे दिवसेंदिवस महाविकास आघाडी सरकारच्या भवितव्य संकटात आले आहे. हे राजकीय संकटाचे ढग अधिकच गडद होत चालले आहेत तसतशी त्यांची चिंताही वाढत आहे. बंडखोर आमदारांना परत बोलवण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यापासून शिवसेनेतील उरले सुरले सर्वजण प्रयत्न करत आहेत. असे असताना आता या सत्तासंघर्षाच्या युद्धात खुद्द महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरेही उतरल्या आहेत.

बंडखोर आमदारांचे मन वळवण्याचे सर्व प्रयत्न करुनही अयशस्वी होत असल्याने रश्मी ठाकरे यांनी पुढाकार घेतला आहे. रश्मी ठाकरे बंडखोर आमदारांच्या पत्नींशी संपर्क साधून त्यांचे मन वळवण्याचा प्रयत्न करत आहेत. तर उद्धव ठाकरे हेही गुवाहाटीतील बंडखोर आमदारांना परत बोलवण्यासाठी त्यांच्याशी सातत्याने संपर्क साधत आहेत.

Rashmi Thackeray|
सत्तासंघर्ष; समर्थन- विरोधासाठी शिवसैनिक रस्त्यावर

राज्यातील राजकीय लढाईत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांनीही उडी घेतली आहे. रश्मी ठाकरे यांनी बंडखोर आमदारांच्या पत्नींना स्वत: फोन लावून आहे. शिवसेना पक्षप्रमुख आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांनी बंडखोर आमदारांच्या पत्नींना फोन करून त्यांच्याशी चर्चा केल्याचे सांगण्यात येत आहे.

आमदारांनी केलेल्या बंडखोरीमुळे पक्ष आणि सरकार दोन्हीही संकटात आले आहेत. आमदारांच्या या भूमिकेमुळे राज्याचेही नुकसान आहे. त्यामुळे आमदारांच्या पत्नींनी त्यांचे बंड शांत करण्याची विनंती करावी आणि त्यांना महाराष्ट्रात येण्यासाठी राजी करावे, अशी विनंती फोनवरुन करत आहेत. तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेही वेगवेगळ्या माध्यमातून बंडखोर आमदारांना मुंबईत परत येण्याचे आवाहन करत आहेत. गेल्या चार-पाच दिवसांपासून एकनाथ शिंदे हे आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. जिथे उद्धव ठाकरे यांचे प्रयत्न संपले तिथे आता रश्मी ठाकरे याही पदर खोचून कामात या सत्ता संघर्षांच्या रिंगणात उतरल्या आहेत.

दरम्यान, नाराज शिवसेना आमदारांनी बंड पुकारल्यानंतरही सर्वच काडीमोड झाला असे अद्यापही झालेले नाही. एकीकडे रश्मी ठाकरे बंडखोर आमदारांच्या पत्नींच्या संपर्कात आहेत तर दुसरीकडे मुख्यमंत्र्यांचाही मेसेजद्वारे आमदारांशी संवाद हा सुरु आहे. बंडखोरी करुनही आमदरा आपण शिवसेनेसोबतच असल्याच्या वक्तव्यामुळे संभ्रम स्थिती निर्माण झाली आहे. तर गुवाहटीहून आमदार मुंबईत आले कर चित्र वेगळे असेल, असा विश्वासही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला आहे. तर काही आमदार संपर्कात असल्याचेही बोलले जात आहे. त्यामुळे आता मुख्यमंत्र्यांच्या प्रयत्नानंतर आता रश्मी ठाकरे यांच्या प्रयत्नांना कितपत यश मिळेल हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com