उद्धव ठाकरेंच्या मेहुण्याला सीबीआयकडून दिलासा

श्रीधर पाटणकर गेल्या काही महिन्यापासून सीबीआय, ईडीच्या रडार होते.
 shridhar patankar,uddhav thackeray
shridhar patankar,uddhav thackeraysarkarnama

मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (uddhav thackeray) यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर (shridhar patankar) यांना न्यायालयाने दिलासा दिला आहे, त्यांच्याविरोधात कारवाईसाठी सबळ पुरावे नसल्याचा (क्लोजर रिपोर्ट)अहवाल केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने (सीबीआय) दिला आहे.

हा अहवाल न्यायालयाने स्वीकारला आहे. ईडीचा विरोध असूनही विशेष सीबीआय न्यायालयाने क्लोजर रिपोर्ट स्वीकारला आहे. श्रीधर पाटणकर व्यवसायाने बिल्डर आहेत. मुंबई आणि ठाण्यात प्रामुख्याने त्यांचे प्रकल्प आहेत.

पाटणकर गेल्या काही महिन्यापासून सीबीआय, ईडीच्या रडार होते. ८४.६ कोटींच्या गैरव्यवहारप्रकरणी ईडीने युनियन बँकेचे अधिकारी, काही ज्वेलर्स आणि पुष्पक बुलियन कंपनीचे संचालक यांच्याविरोधात मनी लाँड्रिगचा गुन्हा दाखल केला होता. त्याचा तपास सुरु होता. याप्रकरणी ईडीनं श्रीधर पाटणकर यांची साडे सहा कोटींची मालमत्ता जप्त केली होती.

 shridhar patankar,uddhav thackeray
ठाकरेंकडून फडणवीसांची स्तुती ; म्हणाले, 'हे तुम्ही तुमच्या कृतीतून दाखवून दिलं..

काय आहे हे प्रकरण ?

  • नोटबंदीनंतर काळा पैसा रोख रकमेच्या स्वरूपात जमा असलेल्या मुंबईत काही राजकीय नेत्यांच्या मदतीला हवाला नेटवर्क चालवणारे चंद्रकांत पटेल धावून आले.

  • जुन्या नोटा जमा करण्यासाठी 40 दिवसांची मुदत दिली होती. परंतु कोणत्याही बँकेत नोटा जमा करायच्या असल्यास सर्व कागदपत्रे द्यावी लागत होती.

  • काळा पैसा पांढरा करण्यासाठी महेश पटेल आणि चंद्रकांत पटेल यांनी हवाला ऑपरेटर्समार्फत खोट्या शेल कंपन्या उघडल्या.

  • नेत्यांनी चंद्रकांत पटेल नामक हवाला ऑपरेटर्सची कामे करणाऱ्याशी संपर्क साधला आणि त्याच्याकडे 84 कोटी रुपयांच्या स्वरूपात रोख रक्कम, सोने दिले.पुष्पक सराफ कंपनी ही महेश पटेल, चंद्रकांत पटेल यांच्याच अधिकृत मालकीची आहे.

  • पुष्पक रिअलिटीने एका व्यवहारासाठी विविध स्तरांचा वापर करून 20.02 कोटी रुपयांचा निधी नंदकिशोर चतुर्वेदी यांच्याकडे वळवला.

  • महेश पटेल यांचे पैसे नंदकिशोर चतुर्वेदी यांच्यामार्फत श्रीसाईबाबा गृहनिर्मिती प्रायव्हेट लिमिटेडमध्ये गुंतवण्यात आले.

  • साईबाबा गृहनिर्मिती कंपनी ही रश्मी ठाकरे यांचे बंधू श्रीधर माधव पाटणकर यांच्या मालकीची आहे.

  • श्रीधर पाटणकरांच्या ठाण्यातील नीलांबरी प्रोजेक्ट्समधील 11 सदनिकांही ईडीनं जप्त केल्या आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com