Phone tapping :'अमजद खान' असलेल्या नाना पटोलेंचा आज पुणे पोलिस नोंदविणार जबाब

नाना पटोले यांच्या नावासमोर अमजद खान असे लिहून त्यांचे फोन टॅप केले होते.
rashmi shukla, nana patole
rashmi shukla, nana patole sarkarnama

मुंबई : महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांचे फोन टॅपिंग करुन त्यांना अडचणीत आणल्याप्रकरणी आयपीएस (IPS) अधिकारी रश्मी शुक्ला (Rashmi Shukla) याची चौकशी सध्या सुरु आहे. याप्रकरणात आज काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांचा जबाब नोंदविण्यात येणार आहे. (rashmi shukla phone tapping case latest news)

शुक्ला यांनी शिवसेनेचे नेते, खासदार संजय राऊत, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole), राज्यमंत्री बच्चू कडू, आशिष देशमुख आणि संजय काकडे यांचे फोन टॅप केले होते. नाना पटोले यांच्या नावासमोर अमजद खान असे लिहून त्यांचे फोन टॅप केले होते.

rashmi shukla, nana patole
अमित शहा यांच्या दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी भाजप नेत्याचा संशयास्पद मृत्यू ; शहा यांचा समारंभ रद्द

याप्रकरणी पुणे पोलिस आज नाना पटोले यांचा जबाब नोंदविणार आहेत. शुक्लांवर बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पुण्याच्या पोलीस आयुक्तपदी असताना त्यांनी हे फोन टॅपिंग केले होते. बेकायदा फोन टॅपिंग केल्याचा पोलीस अधिकारी रश्मी शुक्लांवर आरोप आहे.

अमजद खान या नावानं नाना पटोलेंचा फोन टॅप केल्याची माहिती आहे. यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांचेही फोन खोट्या नावांनी टॅप केल्याचं उघड झालं होतं.

पुणे पोलीस (Pune Police) आज मुंबईत येऊन रश्मी शुक्ला फोन टॅपिंग प्रकरणी पटोले यांचा जबाब नोंदवणार आहेत. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि त्यांच्या सहकार्यांचा फोन टॅप करण्यात आला होता. अमजद खान नावानं नाना पटोले यांचा फोन टॅप करण्यात आला होता.

rashmi shukla, nana patole
पहिल्यांदाच मिळणार काश्मिरी पंडितांना आरक्षण ; परिसीमन आयोगाची शिफारस

अमजद खान हा अंमली पदार्थांची तस्करी करणारी टोळी चालवत असून त्याचा पर्दाफाश करण्यासाठी गृह विभागाकडे त्यांनी मागितली होती. त्यावेळील नाव अमजद खान असलं तरी मोबाईन नंबर मात्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा देण्यात आला होता. आज दुपारी पटोले यांचा जबाब पुणे पोलीस मुंबईत नोंदवणार आहेत.

रश्मी शुक्ला यांनी यापूर्वी दोन वेळा कुलाबा पोलिसांनी याप्रकरणी चौकशी केली आहे. संजय राऊत यांच्या फोन टॅंपिगप्रकरणीही सध्या चौकशी सुरु आहे. फोन टॅपिंग प्रकरणात बच्चू कडू यांचे नाव निजामुद्दीन बाबू शेख, संजय काकडे यांचे नाव अभिजित नायर तर आशिष देशमुख यांचे नाव महेश साळुंके असे दाखवले होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com