IPS Rashmi Shuka : रश्मी शुक्लांवर केंद्र सरकार मेहेरबान; 'या' मोठ्या पदावर दिली बढती

राज्य गुप्त वार्ता विभागात कार्यरत असताना रश्मी शुक्ला यांनी महाविकास आघाडीतील नेत्यांचे फोनवरील संभाषण टॅप केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता.
IPS Rashmi Shuka
IPS Rashmi Shuka Sarkarnama

Rashmi Shukla News Update: महाराष्ट्र केडरच्या वरिष्ठ IPS अधिकारी रश्मी शुक्ला यांची सशस्त्र सीमा दलाच्या (Director-General of Sashastra Seema Bal) महासंचालक पदी बढती देण्यात आली आहे. केंद्र सरकारने गुरुवारी (२ मार्च) हा आदेश जारी केला असून ३० जून २०२४ पर्यंत त्यांच्याकडे या पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. एसएसबीच्या त्या दुसऱ्या महिला महासंचालक असतील. रश्मी शुक्ला या महाराष्ट्र गुप्तचर विभागाच्या माजी प्रमुख होत्या.

महाविकास आघाडीचे सरकार कोसळल्यानंतर राज्यात शिंदे-फडवणीस सरकार स्थापन झालं. त्यानंतर रश्मी शुक्ला यांची पुन्हा मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी नियुक्ती होणार असल्याच्या चर्चा सुरु होत्या. राज्य गुप्त वार्ता विभागात कार्यरत असताना रश्मी शुक्ला यांनी महाविकास आघाडीतील नेत्यांचे फोनवरील संभाषण टॅप केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता. मात्र, त्यांच्यावर खटला चालवण्याची मागणी एकनाथ शिंदे सरकारने फेटाळून लावली. एवढेच नाही तर पुणे पोलिसांनी या प्रकरणी क्लोजर रिपोर्टही दाखल केला होता.

IPS Rashmi Shuka
Chinchwad By Election : बंडखोर कलाटेंचं पराभवानंतर मोठं विधान; म्हणाले,''धंगेकरांसारखा मी पण...!''

Chinchwad By Election : बंडखोर कलाटेंचं पराभवानंतर मोठं विधान; म्हणाले,''...तर धंगेकरांसारखा मी ही...!'' | दरम्यान, केंद्रात प्रतिनियुक्तीवर असलेल्या रश्मी शुक्ला ८ फेब्रुवारी २०२१ पासून केंद्रीय राखीव पोलीस बलाच्या अतिरिक्त संचालक पदी कार्यरत होत्या. त्यानंतर आता त्यांची सशस्त्र सीमा दलाच्या (DG SSB) महासंचालक पदी नियुक्ती करण्यात आली आहे. शिवसेना नेते संजय राऊत, राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांचे फोन टॅप केल्याचा त्यांच्यावर आरोप करण्यात आला होता. याप्रकरणी कुलाबा पोलिस ठाण्यात तक्रारही दाखल करण्यात आली होती. त्यापूर्वी भाजप सरकार काळात त्यांनी नाना पटोले यांचेही फोन टॅप केल्याच्या आरोपाखाली शुक्लांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Sarkarnama
www.sarkarnama.in