नोकरी सोडण्याच्या मनस्थितीत असताना डिसले गुरूजींसाठी IAS घोलप आले धावून

रणजितसिंह डिसले यांच्या रजा व शाळेतील अनुपस्थितीमुळे वाद निर्माण झाला आहे.
RanjitSinh Disle, IAS Ramesh Gholap
RanjitSinh Disle, IAS Ramesh GholapSarkarnama

पुणे : ग्लोबल टीचर पुरस्कार मिळाल्यानंतर सेलिब्रिटी झालेले रणजितसिंह डिसले (Ranjitsinh Disale) सध्या शासकीय चक्रव्युहात अडकले आहेत. त्यांच्या रजा, शाळेतील उपस्थिती यावरून अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. काही दिवसांपासून सुरू असलेल्या वादामुळे डिसले गुरूजी निराशेच्या गर्तेत होते. त्यांची नोकरी सोडण्याची मनस्थिती झाली होती. पण अशा कठीण प्रसंगी आयएएस अधिकारी रमेश घोलप (IAS Ramesh Gholap) गुरूजींच्या मदतीसाठी धावून आले. घोलप यांचे विचार गुरूजींच्या मनाला नवी उभारी देणार ठरले.

IAS घोलप हे सध्या झारखंडमध्ये राष्ट्रीय आरोग्य मिशनचे संचालक म्हणून कार्यरत आहेत. ते मुळचे महाराष्ट्राचे आहेत. त्यामुळे महाराष्ट्रात डिसले गुरूजींविषयी वाद सुरू असताना त्यांनी काही 22 जानेवारीला गुरूजींना उद्देशून ट्विटरवर एक पोस्ट लिहिली. यामध्ये त्यांनी गुरूजींना निराशेतून बाहेर पडण्यासाठी आपले विचार मांडले आहेत. तसेच त्यांनी सरकारी व्यवस्थेवरही बोट ठेवलं आहे. सध्याच्या निराशेच्या, नकारात्मकतेच्या काळात सकारात्मकता, संवेदनशीलतेची आणि चांगल्या गोष्टींचं कौतुक करण्याची, चांगलं करण्यासाठी प्रोत्साहित करण्याच्या भुमिकेची प्रचंड गरज आहे, असं त्यांनी डिसले गुरूजींना उद्देशून म्हटलं आहे.

RanjitSinh Disle, IAS Ramesh Gholap
सेलिब्रिटी बनलेल्या डिसले गुरुजींवर कारवाई करायची कशी? जिल्हा परिषदेसमोर तिढा

त्यावर निराशेच्या गर्तेत असताना आपले हे विचार मनाला नवी उभारी देणारे आहेत, डिसले गुरूजी म्हणाले होते. घोलप यांच्या विचारांनी डिसले गुरूजी भारावून गेले होते. घोलप यांनी आपले विचार मांडताना सुरूवातीलाच हिंदीतील चारोळी लिहिली आहे. ‘खूबी और खामी, दोनों होती है हर इंसान में... जो तराशता है उसे खूबी नजर आती है..और जो तलाशता है उसे खामी नजर आती है...!,’ या चारोळीतून घोलप यांनी लोकांचा इतरांकडे बघण्याचा दृष्टीकोन मांडला.

पुढे घोलप लिहितात की, मुळात एकाद्या संस्थेच्या किंवा व्यवस्थेच्या जबाबदार पदावर आपण अधिकारासह स्थानापन्न असतो, तेव्हा त्या व्यवस्थेतील एखाद्या घटकाने संस्था अथवा व्यवस्थेसाठी काय योगदान दिले? त्याचा व्यवस्थेला काय फायदा झाला, असे प्रश्न जेव्हा आपण त्या घटकाबद्दल उपस्थित करतो तेव्हा त्या व्यवस्थेचा प्रमुख म्हणून आपल्या जबाबदारीचे काय, हा प्रश्न आपण स्वत: विचारला पाहिजे. आपल्या टीममधील क्षमतावान सहकाऱ्यांच्या क्षमतेचा वापर करवून घेता येणं हे कर्णधाराचेही अपयश असते याची जाणीव जिम्मेदार व्यक्तीलाही असली पाहिजे.

RanjitSinh Disle, IAS Ramesh Gholap
डिसले गुरुजी अडकले आपल्याच चक्रव्यूहात; शिक्षण विभागाने मागितला या गोष्टींचा खुलासा!

एखाद्या व्यक्तीला कोणत्याही क्षेत्रात स्वत:ला सिध्द करत असताना प्रचंड मेहनत, तपस्या करावी लागते. दोष काढणे खूप सोपे काम आहे. कोणत्याही व्यक्ती परिपूर्ण कधीच होऊ शकत नाही. प्रक्रियेचे पालन करणे बंधनकारक असते ही अपरिहार्यता आहेत, पण त्याचे पालन करत असताना त्या प्रक्रियांचा उद्देश हा लोकांना न्याय देणे, चांगले परिणाम साध्य करणे हा असतो, हेही विसरता कामा नये. सध्याच्या निराशेच्या, नकारात्मकतेच्या काळात सकारात्मकता, संवेदशनशीलतेची आणि चांगल्या गोष्टींचं कौतुक करण्याची, चांगलं करण्यासाठी प्रोत्साहित करण्याच्या भुमिकेची प्रचंड गरज आहे, असं घोलप यांनी म्हटलं आहे.

यामध्ये घोलप यांनी शेवटी माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांचे विचारही मांडले आहेत. ‘तुम्ही चांगलं किंवा वाईट केलं तरी लोकांकडे तुमच्याविषयी बोलण्यासाठी काहीतरी नकारात्मक असते आणि हेच आयुष्य आहे. त्यामुळे लोकं काय म्हणतील याची काळजी करणं थांबवा आणि आयुष्याचा आनंद घ्या, ’ असं त्यामध्ये म्हटले आहे.

‘डायट’मध्ये एकदी दिवस हजेरी नाही

लहान मुलांसाठी शिक्षण सोपे व्हावे, यासाठी डिसले यांनी ‘क्‍यूआर कोड’ शिक्षण पध्दती आणली होती. त्यांच्याकडील या ज्ञानाचा लाभ सर्वांना व्हावा, यासाठी त्यांना ‘डायट’वर तीन वर्षांसाठी प्रतिनियुक्‍ती देण्यात आली होती. प्रत्यक्षात ‘डायट’च्या माध्यमातून त्यांनी विद्यार्थी व शिक्षकांना प्रशिक्षण दिल्याची काहीच नोंद नाही. शाळा आणि ‘डायट’ अशी दोन्ही ठिकाणी हजर नसताना त्यांनी तीन वर्षे सरकारी पगार घेतला होता. या प्रकरणी चौकशी समितीने अहवाल तयार करून जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याकडे पाठवण्यात आला आहे. यावर कार्यवाही प्रस्तावित आहे.

रजा प्रकरणावरून मोठा गदारोळ

डिसले यांच्या रजा प्रकरणावरून मोठा गदारोळ उडाला होता. यात थेट शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी हस्तक्षेप केला होता. त्यावेळी त्यांनी अनेक गंभीर आरोप केले होते. पैशांची मागणी करण्याचा आरोप त्यांनी केला होता. माध्यमांसमोर आरोप करण्यापूर्वी डिसले गुरुजींनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग अथवा न्यायालयात का गेले नाहीत, असा प्रश्‍न या निमित्ताने उपस्थित झाला आहे. आता या प्रकरणी त्यांना पुरावे सादर करण्यास सांगण्यात आले आहे. त्यांनी पुरावे सादर न केल्यासही त्यांच्यावर कारवाई होऊ शकते. महाराष्ट्र नागरी सेवा अधिनियम व जिल्हा परिषद व पंचायत समिती कर्मचारी वर्तणूक अधिनियमानुसार डिसले यांच्यावर या प्रकरणी कारवाई होऊ शकते, अशी माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com