कोश्यारींच्या वक्तव्याचे राणेंकडून समर्थन; शिंदे गट केंद्राकडे करणार तक्रार

Nitesh rane| Dipak Kesarkar| भगसिंह कोश्यारींनी केलं आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे राज्यभरातून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.
Nitesh Rane-Deepak Kesarkar
Nitesh Rane-Deepak Kesarkarsarkarnama

मुंबई : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagatsingh Koshyari) यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे वातावरण तापलं असताना भाजप (BJP) आमदार नितेश राणे यांनी मात्र त्यांच्या वक्तव्याचं समर्थन केलं आहे. '' त्या त्या समाजाला त्यांच्या योगदानाचं श्रेय दिलं पाहिजे, राज्यपाल यांनी वक्तव्यातून हेच स्पष्ट केलं आहे. राज्यपालांकडून कोणाचाही अपमान झालेला नाही, त्यांनी त्या त्या समाजाला योगदानाचं श्रेय दिलं आहे. त्यांच्याविरोधात बोलणाऱ्यांनी मराठी माणसाला आणि तरुणांना किती मोठं केलं हे स्पष्ट करावं, असं ट्विट करत नितेश राणे यांनी विरोध करणाऱ्यांना फटकारलं आहे.

मुंबई एका कार्यक्रमात बोलताना, गुजराती आणि राजस्थानी निघून गेले तर मुंबईत पैसाच उरणार नाही आणि मुंबई आर्थिक राजधानी राहणार नाही, असं वक्तव्य भगसिंह कोश्यारींनी केलं आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे राज्यभरातून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. अशात नितेश राणे यांनी मात्र त्यांच्या वक्तव्याचे समर्थन केल्याने आता हे प्रकरण अधिकच तापणार असल्याची चिन्हे दिसू लागली आहेत.

Nitesh Rane-Deepak Kesarkar
Eknath Khadse: एकनाथ खडसे यांची प्रशासक मंडळाविरोधात न्यायालयात धाव!

''राज्यपालांनी कोणत्याही समाजाचा अपमान केले नाही. मराठी माणसाच त्यांनी अपमान केला नाही. मुंबई महापालिकेत जे टेंडर दिले जातात.ते कोणाला दिले जातात त्यांची आडनाव काय असतात. एवढेच कशाला .. तुमच्या पक्षप्रमुखांनी आपले सगळे पैसे आणि प्रॉपर्टी नंदकिशोर चतुर्वेदी कडे देऊन ठेवली आहे ते चालत का ? तेव्हा मराठी माणूस आठवला नाही ?? असा आरोपही त्यांनी नितेश राणेंनी केला आहे. ' तुम्हाला, अगरवाल, शहा, चतुर्वेदी सगळे लागतात, मग अशा प्रकारच्या वक्तव्यांच वाईट का वाटतं, असाही सवाल नितेश राणे यांनी उपस्थित केला आहे. तुम्हाला अशा वक्तव्यांचं इतकं वाईट वाटतं तर इतक्या वर्षांत तुम्ही मराठी माणसाला सक्षम करुन एखादं उदाहरण तयार करायला पाहिजे होतं ना. असा टोलाही नितेश राणेंनी हाणला आहे.

दरम्यान, शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनीही राज्यपालांच्या या वक्तव्याचा निषेध केला आहे. राज्यपालांच्या वक्तव्यामुळे राज्याचा अपमान झाला आहे. राज्यपाल हे घटनात्मक पद आहे. त्यांच्या वक्तव्याबाबत केंद्र शासनाकडे दाद मागण्याचा अधिकार मुख्यमंत्र्यांना असतो. राज्यपालांकडून अशी विधानं पुन्हा होऊ नयेत, यासाठी केंद्रसरकारकडून त्यांना सांगितलं जाऊ शकतं. मुंबईला घडवण्यात अनेक समाजांचं त्यात योगदान आहे, असं केसरकर यांनी म्हटलं आहे.

आम्ही केंद्र शासनाने ज्यांची नियुक्ती राज्याचं घटनात्मक प्रमुख म्हणून केली, राज्यपाल पदावर असताना त्यांनी वक्तव्यं टाळायला हवीत, त्यांनी राज्याच्या भावना जपायला हव्यात. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे महाराष्ट्र दौऱ्यावरुन आल्यानंतर आम्ही सगळे आमदार त्यांना भेटू आणि त्यांच्यासी चर्चा करु. मराठी माणसाच्या तीव्र भावना केंद्रापर्यंत पोहोचवू,

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in