English Question to Rane : इंग्रजी प्रश्नाला राणेंचे आधी 'या.. या..' अन् नंतर...; 'तो' व्हिडिओ व्हायरल

Narayan Rane and English Question : राणे यांनी मराठीत प्रश्न विचारण्याचा केला आग्रह
Narayan Rane
Narayan RaneSarkarnama

Narayan Rane Video Viral : केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे यांना भाजपच्या पत्रकार परिषदेत एका पत्रकाराने इंग्रजीमध्ये प्रश्न विचारला. त्यावेळी राणे यांनी एक-दोन शब्दात उत्तर दिले. त्यानंतर मात्र त्यांनी नाराजी व्यक्त केली आणि मराठीतून प्रश्न विचारण्यास सांगतले. याबाबतचा व्हिडिओ आता व्हायरल होत आहे.

राणे भाजपची (BJP) भूमिका ठामपणे मांडतात. ते कुणाचीही भीड ठेवत नाहीत. एकदा भाजप नेते प्रवीण दरेकरांना राणे यांनी ऑन कॅमेरा शांत बसण्यास सांगितले होते. आता भाजपच्या पत्रकार परिषदेतील एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. त्यावेळी केंद्रीय मंत्री नारायण राणे, प्रवीण दरेकर दिसत आहेत. यावेळी एका पत्रकाराने राणे यांना इंग्रजीत काही प्रश्न केले. सुरुवातीच्या प्रश्नांना त्यांनी उत्तरे दिली. (Marathi Latest News)

Narayan Rane
Sawant Vs Mote : सावंतांनी वाकाव अन्‌ माढ्याची चिंता करावी; गेटकेन मंत्र्यांनी परंड्यात तोंड खुपसू नये, राहुल मोटेंचा टोला

राज्यातील सध्या 'एमएसएमई' अंतर्गत किती प्रकल्प आहेत, या प्रश्नाचे उत्तर दिल्यानंतर संबंधित प्रश्नाना राणे यांनी 'या.. या..' असे उत्तर दिले. त्यानंतर कोविड काळात राज्यातील प्रकल्प डबघाईला आले होते. कोविडनंतर त्यांना कशी मदत केली, असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी मात्र नारायण राणे (Narayan Rane) यांनी त्यांना मराठीत प्रश्न विचारण्यास सांगितले. तसेच तुम्ही मराठी आहात तुम्हाला मी खूप वर्षांपासून ओळखतो असेही ते म्हणाले.

यावेळी राणे रागवल्याचेही दिसले. ते म्हणाले, "तुम्ही मराठी आहात. त्यामुळे मराठीत प्रश्न विचारा. असे अर्धे हिंदी, अर्धे इंग्रजीत का प्रश्न विचारता. तुम्हाला मी अनेक वर्षांपासून ओळखतो." राणे यांच्या आग्रहानंतर पत्रकाराने मराठीत प्रश्न विचारण्यास सुरूवात केली." यावेळी प्रवीण दरेकर (Pravin Darekar) हाताची घडी घालून शांतपणे ऐकताना व हसताना दिसले. हा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

दरम्यान, या व्हिडिओमुळे राणे मुख्यमंत्री असतानाचा एक किस्सा बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray ) यांनी सांगितला होता. मुख्यमंत्री असलेल्या राणे यांच्या भेटीसाठी काही परदेशी उद्योजक आले होते. त्यावेळी राणे यांनी फक्त 'येस... नो...' अशी उत्तरे दिल्याचे बाळासाहेबांनी सांगितले होते. शिवसेनेतून बाहेर पडलेल्या राणेंवर टीका करताना ठाकरेंनी हा किस्सा सांगितला होता.

(Edited by Sunil Dhumal)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in