राणा दाम्पत्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

Navneet Rana| Ravi Rana| Mumbai Police | खार पोलिसांनी नवनीत राणा आणि रवी राणा यांना अटक केली.
Ravi Rana| Navneet Rana|
Ravi Rana| Navneet Rana|

मुंबई : राणा दाम्पत्याला न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. राणा दाम्पत्यांला असे करण्यासाठी कोणी उद्युक्त केले, त्यामागे कोणाचा हात होता, याचा तपास करण्यासाठी राणा दाम्पत्यांची सात दिवसांची कोठडीची मागणी सरकारी वकील प्रदीप घरत यांनी केली. मात्र राणा दाम्पत्यांवरील आरोप चुकीचे असल्याचे सांगत वकील रिजवान मर्चंट यांनी विरोध केला. त्यानंतर न्यायालयाने दोन्ही पक्षाचा युक्तीवाद ऐकून घेतल्यानंतर न्यायालयाने राणा दाम्पत्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली.

दरम्यान, राणा दाम्पत्याचे वकील रिजवान मर्चंट यांनी तातडीने त्यांच्या जामिनासाठी अर्ज केला. मात्र न्यायालयाने तातडीने या अर्जावर सुनावणी घेण्यास वांद्रे न्यायालयाने नकार दिला. आता या जामिनावर २९ एप्रिलला सुनावणी होणार आहे. नवनीत राणा भायखळा येथील महिलांच्या कोठडीत राहणार आहेत. सरकारी पक्ष २७ एप्रिलला लेखी युक्तीवाद देण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.

Ravi Rana| Navneet Rana|
मुख्यमंत्री ठाकरे पंतप्रधान मोदींच्या स्वागताला जाणार नाहीत?

मातोश्री’समोर हनुमान चालिसा पठणाचा राणा दांपत्यानं इशारा दिल्यानंतर मोठा गदारोळ सुरू झाला होता. अखेर खार पोलिसांनी खासदार नवनीत राणा (Navneet Rana) आणि आमदार रवी राणा (Ravi Rana) यांना अटक केली. त्याआधी नवनीत राणा आणि रवी राणा यांच्या मुंबईतील खार येथील घराबाहेर मोठा राडा झाला. खार येथील राणा यांच्या घराबाहेर शिवसैनिकांनी काल मोठ्या प्रमाणात गर्दी जमल्यामुळे वातावरण तणावपूर्ण बनले होते. राणा दांपत्यांनी शिवसेना आणि मुख्यमंत्र्यांची माफी मागावी, या मागणीसाठी बाहेरचे शिवसैनिक मागणी करत होते.

यामुळे दोन्ही बाजूंकडून तणाव वाढला होता. खार पोलिसांनी राणा दांपत्यास त्यांच्या घरी जाऊन त्यांना ठाण्यात येण्याचे आवाहन केले. त्यावेळी राणा दांपत्य आणि पोलिसांमध्ये बाचाबाची झाली. पोलिस राणा दांपत्यास वारंवार विनंती करत होते. त्यावेळी राणा हे पोलिसांना आमचे अटक वॉरंट दाखवा, असे विचारत होते. त्यामुळे ते पोलिसांसोबत येण्यास तयार नव्हते. पण पोलिसांच्या शिष्टाईला यश आले आणि त्यांना कडेकोट पोलिस बंदोबस्तात राणा यांना त्यांच्या खार येथील घरातून सुरक्षितपणे बाहेर काढले. अखेर पोलिसांनी सुरक्षितपणे त्यांना घराबाहेर काढून त्यांना खार पोलीस ठाण्यात नेले. नंतर त्यांना अटक करण्यात आली. राणा दांपत्यावर दंगल सदृश्य परिस्थिती निर्माण केल्याप्रकरणी कलम १५३ अ लावण्यात आलं आहे. हा गंभीर आणि अजामीनपात्र गुन्हा आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com