ठाकरे सरकार बरखास्तीसाठीच राणा दांपत्याने 'मातोश्री'ची निवड केली होती!

Navneet Rana | Ravi Rana : राणा दाम्पत्यांच्या अडचणी वाढणार?
Ravi Rana News| Navneet Rana News, Navneet Rana Latest Marathi News
Ravi Rana News| Navneet Rana News, Navneet Rana Latest Marathi NewsSarkarnama

मुंबई : न्यायालयीन कोठडीत असलेल्या अपक्ष खासदार नवनीत राणा (Navneet Rana) आणि आमदार रवी राणा (Ravi Rana) यांच्या अडचणींमध्ये वाढ होत चालली आहे. या दोघांनी जामीनासाठी सत्र न्यायालयात अर्ज केला आहे. पण सरकारने त्यांच्या जामीनाला जोरदार विरोध केला आहे. त्यासाठी सरकारने राणा दाम्पत्याची कुंडलीच बाहेर काढली आहे. दोघांवरही ठिकठिकाणी एकूण तब्बल २१ गुन्हे दाखल असून त्यातील काही गंभीर स्वरुपाचे आहेत. त्यामुळे त्यांना जामीन देऊ नये, अशी मागणी सरकारच्यावतीने न्यायालयात करण्यात आली आहे.

यात प्रामुख्याने गंभीर आरोप आहे तो म्हणजे राजद्रोह. कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण करत सरकार बरखस्त करण्याची राणा दाम्पत्याची योजना असल्याचा आरोप सरकारकडून करण्यात आला आहे, सरकारी वकील अॅड. प्रदीप घरत यांनी जामीन अर्जावर दिलेल्या उत्तरात हे गंभीर आरोप केले आहेत.

ठाकरे सरकार बरखास्तीसाठीच राणा दांपत्याने 'मातोश्री'ची निवड केली होती!

सरकारबाबत असंतोष निर्माण करण्यासाठी विद्यमान सरकारवर हल्ला करण्याच्या उद्देशाने टीकेची मर्यादा ओलांडली गेली, त्यामुळे राणा पती पत्नीचे भाषण कलम 124 (A) अंतर्गत समाविष्ट करण्यासारखंच असल्याचे या उत्तरात नमूद करण्यात आले आहे.

भारतात कायद्याने स्थापन केलेले सरकार पूर्णपणे अप्रामाणिक आणि अन्यायकारक आहे आणि ते रद्द करण्यासाठी हिंसाचाराने किंवा हिंसाचाराची धमकी देऊन पाऊल उचलले पाहिजे असे सुचवणारे भाषण कलम राजद्रोह अर्थात 124(A) च्या तरतुदींमध्ये येते.

मुख्यमंत्र्यांच्या खाजगी निवासस्थानी मातोश्री बंगल्यावर "हनुमान चालीसा" वाचण्याची योजना कायदा आणि सुव्यवस्थेसाठी हा एक आव्हान निर्माण करण्याचा एक मोठा डाव होता. कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती बिघडली असता अताचे सरकार कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी कार्यक्षम नाही असे सांगत राज्यपालांकडून सध्याचे सरकार बरखास्त करण्याची शिफारस केली जावी अशी योजना होती.

सत्तेपासून वंचित राहिलेले विरोधी भाजप नेते सध्याच्या सरकारच्या प्रशासकीय धोरणांना कडाडून विरोध करत आहेत आणि हिंदुत्वाच्या भूमिकेवरून शिवसेनेवर टीका करत आहेत. त्यामुळे विरोधी पक्ष आणि शिवसेनेचे राजकीय विरोधक धर्माच्या मुद्द्यावरून वादात आहेत.

Ravi Rana News| Navneet Rana News, Navneet Rana Latest Marathi News
राज ठाकरेंच्या सभेला मनसैनिकांना मिळणार हिंदु संघटनांची ताकद

आरोपी हे प्रबळ राजकीय विरोधक आहेत. त्यामुळे त्यांनी तथ्ये विचारात घेऊन एक अतिशय प्रभावी योजना तयार केली आहे असे तपासात समोर आले आहे.

कला नगर, वांद्रे येथील मातोश्री बंगला हे शिवसेनेचे कट्टर अनुयायी एक पवित्र आणि श्रद्धास्थान मानतात. "मातोश्री" आणि शिवसेनाप्रमुखांना कोणत्याही प्रकारचे आव्हान शिवसैनिकांना कदापि सहन होत नाहीत आणि मातोश्री किंवा शिवसेनेच्या शिवसेना कार्यालयाला आव्हान दिल्यास ते प्राणाची आहुती देण्यास तयार आहेत.

त्यामुळे असे आव्हान दिल्याने शांतता भंग होईल आणि कायदा व सुव्यवस्था व सार्वजनिक सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण होईल हे आरोपीस माहीत होते.

सध्याचे सरकार हिंदू धर्माचे समर्थन करत नाही आणि मुख्यमंत्री हिंदूंच्या विरोधात आहेत, असा आभास निर्माण करण्यात आला. सामान्य जनतेच्या मनात द्वेष किंवा तिरस्कार निर्माण होईल किंवा महाराष्ट्र सरकार विरुद्ध असंतोष निर्माण करण्याचा प्रयत्न केला गेला. त्याच पद्धतीने शिवसैनिकांना शिवसेनेविरुद्धच्या कोणत्याही कारवाईला विरोध करण्यास प्रवृत्त करत येईल पण त्याच बरोबर धर्माच्या मुद्द्यावरून दुजाभाव आणि शत्रुत्वाच्या भावना वाढवण्यासाठी नागरिकांमध्ये असंतोष किंवा असंतोष निर्माण होईल.

Ravi Rana News| Navneet Rana News, Navneet Rana Latest Marathi News
..तर राज ठाकरेंची सभाच बंद पाडणार! भीम आर्मीचा थेट इशारा

सध्याच्या राजवटीत हिंदूंना त्यांचा धर्म मोकळेपणाने आचरणात आणणे अवघड झाले आहे आणि त्यामुळे मुस्लिम धर्माविरुद्ध पर्यायाने द्वेषाची भावना वाढेल आणि त्यामुळे विविध वर्गातील नागरिकांमधील तेढ वाढून धर्माच्या मुद्द्यावरून समाजात फूट पडेल. सार्वजनिक शांततेला धक्का न लावल्याशिवाय स्वतःच्या घरात, देवाच्या मंदिरात किंवा सार्वजनिक ठिकाणी आपला धर्म पाळण्याचा निश्चित अधिकार आहे. एखादी व्यक्ती सरकारला अशी धमकी किंवा आव्हान देऊ शकत नाही.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com