राणा दांपत्य विरुद्ध राष्ट्रवादी सामना: एकाच मंदिरात हनुमान चालिसा पठण करणार

Navneet Rana | Ravi Rana| Nagpur| २८ मे रोजी राणा दांपत्य नागपूरला रवाना होणा आहेत.
Ravi Rana|Navneet Rana |
Ravi Rana|Navneet Rana |

Navneet Rana Latest news update

मुंबई : तुरुंगातून बाहेर आल्यानंतर राणा दांपत्य पहिल्यांदाच विदर्भाचा दौरा करणार आहेत. 28 मे रोजी ते नागपूरला जाणार आहेत. नागपुरात गेल्यानंतर ते पून्हा राम मंदिरात हनुमान चालिसा पठण आणि हनुमान आरती व महापूजा करणार आहेत. त्यानंतर ते अमरावतीला जातील.

28 मे रोजी नागपुरात नवनीत राणा यांच्या हनुमान आरतीच्या वेळेस राष्ट्रवादी कॉंग्रेस महागाई विरोधात आंदोलन करणार आहे. नवनीत राणा ज्या मंदिरात हनुमान चालिसा पठण करणार आहेत. त्याचं रामनगर हनुमान मंदिरात राष्ट्रवादी कॉंग्रेस महागाईविरोधात आंदोलन करणार आहे. राज्यावरील महागाईचं संकट जावं म्हणून राष्ट्रवादीचे नेते प्रशांत पवार हनुमान चालिसा पठण करणार आहेत. त्यामुळे मंदिरात एकाच वेळी राष्ट्रवादी आणि नवनीत राणा यांच्याकडून हनुमान चालिसा पठण करण्यात येणार आहे, यामुळे हा सामना चांगलाच रंगणार असल्याची चर्चा सध्या नागपूरात सुरु आहे.

Ravi Rana|Navneet Rana |
राणा दांपत्याची माघार; न्यायालयातून अर्ज घेतला मागे

दरम्यान, खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांना न्यायालयाकडून दिलासा मिळाला आहे. राणा दांपत्याचे खार येथील फ्लॅटमधील अनधिकृत बांधकामासंदर्भात मुंबई महापालिकेने कारवाईचे आदेश दिले होते. याप्रकरणी दिडोंशी न्यायालयाने पुढील आदेशापर्यंत मुंबई महानगरपालिकेला कारवाई न करण्याचे आदेश दिले.

न्यायालयाने राणा दांपत्याला अर्ज सादर करण्यास 1 महिन्याची मुदत दिली आहे. मुंबई महापालिकेनं (Mumbai Municipal Corporation) नवनीत राणा यांच्या घराच्या बांधकामाची पाहणी केली. त्यावेळी त्यांनी बांधकामात बदल केल्याचा ठपका ठेवत बांधकाम अनधिकृत असल्याचा दावा केला आहे.

राणा दांपत्याचे मुंबईतील खार येथील निवासस्थानाचे बांधकाम अनधिकृत असल्याचे सांगत मनपाने दोनदा नोटीस बजावली. पंधरा दिवसांत बांधकाम पाडावं नाहीतर कारवाई करण्याचा इशारा महापालिकेनं दिला होता. महापालिकेच्या नोटीसीविरोधात राणा दांपत्याने न्यायालयात धाव घेतली. आज न्यायालयाने त्यांना दिलासा दिला.न्यायालयाने त्यांना निवासस्थानासंदर्भात न्यायालयाकडून अर्ज करण्यास एक महिन्याची मुदत दिली. तसेच पुढील आदेशापर्यंत मुंबई मनपाला कारवाई न करण्याचे आदेश न्यायालयाने दिले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com