शिंदे गटाला मोठा झटका; गावकर्यांनी केली चक्क आमदाराची हकालपट्टी

सोशल मीडियावर व्हिडीअो व्हायरल
Ramesh Bornare News, Aurangabad Latest Marathi News, Maharashtra Political Crisis
Ramesh Bornare News, Aurangabad Latest Marathi News, Maharashtra Political CrisisSarkarnama

मुंबई : शिंदे गटाचे आमदार रमेश बोरनारे यांचा हा एक व्हिडीअो सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होतो आहे. त्या व्हिडीअोत बोरनारे यांना चक्क गावकर्यांनीच गावाबाहेर काढल्याचं दिसत आहे. यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली असून या प्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे.

रमेश बोरनारे हे वैजापूरचे शिवसेनेचे आमदार असून त्यांनी बंडखोरीनंतर शिंदे गटाला पाठिंबा दिला होता. बोरनारे या निर्णयामुळे स्थानिक पातळीवर नाराजी असल्याचे एका व्हायरल व्हिडीअोत दिसत आहे. या व्हिडीअोतील प्रसंग हा वैजापूर तालुक्यातील महालगाव येथील आहे. यावेळी शिंदे गटाचे आमदार बोरनारे यांचे समर्थक आणि ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार बाचाबाची झाली. यावेळी त्याठिकाणी काही वेळ तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली होती.यावेळी गावकऱ्यांनी बोरनारे यांना गावाबाहेर जाण्यास सांगितले. त्यानंतर बोरनारे हे तिथून निघून गेल्याचं दिसत आहे. (MLA Ramesh Bornare latest news)

Ramesh Bornare News, Aurangabad Latest Marathi News, Maharashtra Political Crisis
'वेदांता-फॉक्सकॉन' प्रकरणी मुख्यमंत्री शिंदेंनी समोरा-समोर येवून चर्चा करावी; आदित्य ठाकरेंचे आव्हान

आमदार रमेश बोरनारे ( Ramesh Bornare) हे महालगाव येथे एका दुकानाच्या उद्घाटनासाठी आले होते. उद्घाटन केल्यानंतर ते माजी पंचायत समिती सदस्य बापू झिंजूरडे यांच्या घरी चहापानासाठी जात असतानाच अविनाश गलांडे व त्यांच्या समर्थकांनी राम मंदिर परिसरात काळे झेंडे दाखवून घोषणाबाजी करत आमदारांचा निषेध केला. त्यातच आमदार बोरनारे हे झिंजूरडे यांच्या घरून परतत असताना गावाच्या वेशीजवळ पुन्हा अविनाश गलांडे यांच्या समर्थकांनी झेंडे दाखवत घोषणा दिल्या. यावेळी दोन्ही गटात बाचाबाची झाली. त्यामुळे तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली.

संबंधित प्रकाराची माहिती समजताच वीरगाव पोलिसांनी तिथे धाव घेतली. या प्रकरणी ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांविरोधात पोलिसांत तक्रार दिली आहे.

Ramesh Bornare News, Aurangabad Latest Marathi News, Maharashtra Political Crisis
राऊत तुरूंगाबाहेर.. देशमुखांना दिलासा आता मलिकांना जेल की बेल?

शिवसेनेतील बंडखोरीत शिंदे गटाला पाठिंबा

जून महिन्यांत शिवसेनेतील बंडखोरी उफाळून आली होती. यावेळी एकनाथ शिंदे यांच्यासह 40 आमदारांनी शिवसेनेतून बाहेर पडले होते. या नंतर राज्यात महाविकास आघाडी सरकार कोसळले आणि शिंदे यांच्या गटाने भाजपसोबत राज्यात सत्ता स्थापन केली. यादरम्यान, शिंदे गटाच्या आमदारांना गुवाहाटीच्या एका हॉटेलमध्ये सुरक्षित ठेवण्यात आले होते. यात वैजापूरचे आमदार रमेश बोरनारे यांचा देखील समावेश होता.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com