रामदेव बाबांनी मागितली माफी; राज्य महिला आयोगाकडे केला खुलासा

महिला सलवार सूटमध्ये सुद्धा चांगल्या वाटतात, आणि माझ्या नजरेने तर त्या काही नाही घातलं तरी चांगल्या दिसतात, असे रामदेव बाबा म्हणाले.
Ramdev Baba
Ramdev Baba

Ramdev Baba : मी नेहमीच माता आणि मातृशक्तीला अनन्यसाधारण महत्त्व दिले आहे. माझ्या एक तासाच्या व्याख्यानातही मातृशक्तीचा अभिमान आहे आणि कपड्यां संदर्भात जो एक शब्द बोलला होता, त्याचा अर्थ माझ्यासारख्या साध्या कपड्यांबद्दल होता. तरीही कोणाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर त्याबद्दल मी मनापासून खेद व्यक्त करतो. माझ्या बोलण्याने दुखावलेल्यांची माफी मागतो.'' अशा शब्दात बाबा रामदेव यांनी माफी मागितली आहे.

बाबा रामदेव यांनी दोन-तीन दिवसांपुर्वी एका कार्यक्रमात केलेल्या आक्षेपार्ह विधानामुळे मोठा गोंधळ माजला होता. त्यांच्या या विधानाची राज्य महिला आयोगाने दखल घेत त्यांना खुलासा देण्याचे आदेश दिले होते त्यानंतर त्यांनी आयोगाला खुलासा देत महिलांची माफी मागितली आहे. राज्य महिला आयोगाने त्यांचे खुलाशाचे पत्र ट्विट करत माहिती दिली आहे.

Ramdev Baba
Ramdev Baba : महिला साडीत छान वाटतात, काही घातलं नाही तरी छान वाटतात : हे काय बोलून गेले बाबा..

या पत्रात, आपण कोणताही गुन्हा केलेला नाही. महिलांना समाजात समान दर्जा मिळावा.यासाठी भारत सरकारच्या बेटी बचाओ बेटी पढाओ सारख्या विविध धोरणांचा आणि योजनांचा प्रचार केला आहे. भारतातील महिलांचा दर्जा वाढवण्यासाठी आणि त्यांना अधिक सशक्त करण्यासाठी आपण विविध संस्थांसोबत काम करत आहोत. संबंधित कार्यक्रमात महिलांचा अपमान करण्याचा आपला कोणताही हेतू नव्हता. ठाण्या आयोजित केलेला संपूर्ण कार्यक्रम हा महिला सक्षमीकरणाबाबत होता. या कार्यक्रमाचे काही सेकंदांचे व्हिडीओ सोशल मीडियावर प्रसारित करून माझ्या शब्दांचा चुकीचा अर्थ काढला गेला.'' असे स्पष्टीकरण बाबा रामदेव यांनी दिले आहे.

तसेच, 'मी नेहमीच माता आणि मातृशक्तीला अनन्यसाधारण महत्त्व दिले आहे. माझ्या एक तासाच्या व्याख्यानातही मातृशक्तीचा अभिमान आहे आणि कपड्यां संदर्भात जो एक शब्द बोलला होता, त्याचा अर्थ माझ्यासारख्या साध्या कपड्यांबद्दल होता. तरीही कोणाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर त्याबद्दल मी मनापासून खेद व्यक्त करतो. माझ्या बोलण्याने दुखावलेल्यांची माफी मागतो.' असे म्हणत त्यांनी जाहीर माफीही मागितली आहे.

काय म्हणाले होते रामदेव बाबा?

महिला साड्या नेसून पण चांगल्या वाटतात, महिला सलवार सूटमध्ये सुद्धा चांगल्या वाटतात, आणि माझ्या नजरेने तर त्या काही नाही घातलं तरी चांगल्या दिसतात, असे रामदेव बाबा म्हणाले. यावेळी मंचावर त्यांच्यासोबत अमृता फडणवीसही उपस्थित होत्या. हा कार्यक्रम महिलांसांठी आयोजित करण्यात आला होता. महिलांसाठी योग प्रशिक्षणाचा कार्यक्रम होता. कार्यक्रमात सकाळी योग शिबिर झाले, कार्यक्रमासाठी महिलांनी साड्या आणल्या होत्या. मात्र त्वरित महिलांसाठी महासंमेलन सुरू झाले. यामुळे महिलांना साड्या नेसायला वेळच मिळाला नाही. विशेष म्हणजे, रामदेव बाबांनी हे वादग्रस्त विधान केले तेव्हा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र आणि खासदार श्रीकांत शिंदे हे देखील या कार्यक्रमाला उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com